Editor

शिवस्मारक उभारणीच्या प्रक्रियेतील अनियमिततेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आ.मेटेंच्या पत्रामुळे विरोधकांच्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याचे विखे-पाटील यांचे प्रतिपादन

अरबी समुद्रातील शिवस्मारकावरूनही सरकारला पिंजऱ्यात उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये घोळ सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी अनेकदा केला. पण हे आरोप राजकीय असल्याची सबब सांगून सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता शिवस्मारक समितीचे प्रमुख आ. विनायक मेटे यांनी सरकारला पत्र लिहून गंभीर आरोप करत चौकशीचीही मागणी केली. या गंभीर …

Read More »

फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’! शेतकऱ्यांना तातडीने ५० हजारांची मदत व सरसकट कर्जमाफी देण्याची विखेंची मागणी

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र गंभीर दुष्काळाने होरपळून निघाला असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास विलंब करीत असून, दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करणे हे शेतकऱ्यांचे शोषण आहे. फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’ असे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील …

Read More »

गुन्हेगारी व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचे राजकिय पक्षांना सूचना

मुंबई : प्रतिनिधी निवडणुकांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. येथे राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्य घटनेतील ७३ व ७४ …

Read More »

तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते लोकसभा विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जून खर्गे यांची टीका

औसा : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते. पण दुर्दैवाने अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्र्यांना तो दिसून येत नाही. म्हणूनच राज्यात दुष्काळ नव्हे तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी बोचरी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि …

Read More »

डिजीटल सोल्युशन शेतीसाठी वरदान उपराष्ट्रपतींच्या हस्ते तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी हवामान आधारित शेतीसाठी सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन दुप्पट करतानाच खर्च कमी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. डिजीटल सोल्युशन शेतीसाठी वरदान ठरू शकते. शाश्वत शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. पवई येथील आयआयटी मुंबईच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त शेतीसाठी …

Read More »

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार १२ हजार रूपयांचा अग्रिम कोणत्याही सणाला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सण अग्रिमात वाढ केली असून आता हा अग्रिम १२ हजार ५०० रुपये एवढा राहील. १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८०० पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना …

Read More »

त्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन चार वर्षात ३५८.१४९ हेक्टरवर वृक्ष लागवड

मुंबई : प्रतिनिधी त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचे काम जोमाने सुरु असून आतापर्यंत चार वर्षात ३५८.१४९ हेक्टर वन जमीनीवर या पद्धतीने ५ लाख १७ हजार ०९६ वृक्षलागवड झाली आहे, अशा पद्धतीने राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करणारे महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार …

Read More »

छत्रपतींच्या स्मारकाला तांत्रिक परवानगी नाही सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा नवाब मलिक यांचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे दोन वर्षापूर्वी मोदींनी जलपूजन केले होते. परंतु पुढे त्याचे काही झालेले नाही. …

Read More »

२२ हजार कोटींच्या गुंतवणूकीसाठी १० हजार कोटींची सबसिडी धारावी प्रकल्पातील गुंतवणूकीसाठी राज्य सरकारची अभिनव शक्कल

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी झोपडपट्टी पुर्नवसनाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्यातील फडणवीस सरकारने पुढाकार घेतला. या पुर्नवसनासाठी २२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची तयारी काही गुंतवणूकदारांनी दाखविली असली तरी, या गुंतवणूकीच्या बदल्यात राज्य सरकारकडून तब्बल १० हजार कोटी रूपयांची सबसिडी गुंतवणूकदाराला देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी …

Read More »

मुंबईतील सीसीटीव्ही डायल १०० शी जोडणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासह डायल १०० प्रकल्पाचे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच या प्रकल्पासाठी येणाऱ्या ९८० कोटी ३३ लाख ८० हजार रूपये खर्चासही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई शहराच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी मिळणार आहे. मुंबई …

Read More »