Editor

राज्यात नव्या वीस वसतिगृहांची मुहूर्तमेढ दोन हजार मुलामुलींच्या निवासाची सोय होणार असल्याची मंत्री बडोलेंची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभाग तत्पर असून त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी निवासाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी या वर्षी राज्यात तब्बल वीस नवीन वसतिगृहांसह निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या वसतिगृहात दोन हजार विद्यार्थी विद्यार्थीनींच्या निवासाची सोय होणार आहे, …

Read More »

भिडेंला अटक, अन्यथा विधानभवनावर धडक मोर्चा प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला २६ मार्चचा अल्टिमेटक

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगाव येथील दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना जामिन अर्ज नाकारल्यानंतर त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. मात्र, याप्रकरणातील मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही, तर येत्या २६ मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढणार, असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मात्र, हा मोर्चा …

Read More »

जेव्हा शिवसेनेचा तालिका अध्यक्ष सेनेच्याच आमदारांना परवानगी नाकारतो विरोधी पक्षनेते विखे-पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पुन्हा बोलण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर विविध विभागांना वाटप करण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगाने आमदारांकडून चर्चा  सुरु करण्यात आली.  यावेळी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे निर्धारीत कालावधीपेक्षा जास्त बोलत असल्याचे कारण पुढे करत विधानसभेचे तालिका अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी नरके यांना मध्येच थांववित काँग्रेसच्या सदस्यास बोलण्यास सांगितल्याने शिवसेनेच्या …

Read More »

विजयाच्या माघारीने सहाजणांचा विजय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवडणूकीतून माघार

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेवर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला. तर भाजपकडून सुरुवातीला तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ४ था उमेदवार अर्थात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना अर्ज भरायला लावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

Read More »

बाहुबलीसोबत जमली पूजाची जोडी आता प्रभास सोबत पूजाचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी पूजा हेगडे हे नाव यापूर्वी निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित ‘मोहेंजो दारो’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलं. पदार्पणताच ऋतिक रोशनसारख्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत जोडी जमवत पूजाने रसिकांवर जादू करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, पण चित्रपटाला आलेल्या अपयशामुळे तिला त्याचा फारसा फायदा झाला नाही. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या …

Read More »

तापसीचा पंजाब दी कुडी अवतार ‘मनमर्झियां’ चित्रपटाद्वारे पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी बॅालिवुडमध्ये एंट्री केल्यापासून अभिनेत्री तापसी पन्नूने विविधांगी भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना त्यातील आव्हानंही तापसीने लीलया पेलली आहेत. याच बळावर तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तापसी अल्पावधीतच बॅालिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. ‘चष्मेबद्दूर’ या पदार्पणाच्या हिंदी सिनेमात विशेष …

Read More »

औरंगाबादेतील कायदा व सुव्यवस्थेचा ‘कचरा’ केल्याने आयुक्त यादव घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले सक्तीच्या रजेवर: काँग्रेससह सर्व पक्षांनी कामकाज रोखून धरले

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद येथील कचरा डेपोच्या प्रश्नी नागरीकांनी विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. तसेच आंदोलनकर्त्या नागरीकांवर अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेचे कामकाज रोखून धरत औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर अखेर …

Read More »

राज्याची महसूली तूट शुन्यावर आणणार आणखी ५-६ वर्षे काम करावे लागणार असल्याची अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महसूली उत्पन्नात १५ हजार कोटी महसुली तूट येणार असल्याचे जरी स्पष्ट असले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हा खर्च आहे. त्यामुळे ही तूट येणार असल्याचे सांगत महसुली तूट रकमेत मोजायची नसते. २००९-१० मध्ये महसुली तुटीची टक्केवारी ९४ टक्के होती ती आता ५५ टक्क्यांवर …

Read More »

भिसे आणि बोंद्रे यांचा मंत्री लोणीकर आणि मंत्री तावडेंच्या उत्तरावर संताप ४५ दिवस आधी प्रश्न देवूनही उत्तरे चुकीचे देत असल्याचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मंत्री महोदय ज्या गावात योजना सुरु असल्याचे सांगत आहेत. त्या गावातील नदीच्यावरील विहीरीत पाणीच नाही. पाणी नसताना तेथे पाणी पुरवठ्याची योजना कशी सुरु असेल असा सवाल आमदार त्र्यंबकराव भिसे यांनी उपस्थित केली. तसेच मंत्री महोदय चुकीचे उत्तर देत असून चुकीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. …

Read More »

भीमा-कोरेगाव प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. एकबोटे यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »