बिहारमधील बोधगया येथील महाबोधी भगवान बुद्ध मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्याचे निर्देश मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली [सुलेखाताई नलिनीताई नारायणराव कुंभारे विरुद्ध भारतीय संघ]. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम एम सुंदरेश आणि के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने म्हटले की, संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत थेट सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेली …
Read More »स्वतःला कोंडून रहात असलेल्या नवी मुंबईतील प्रोगामरची सीलने केली सुटका कुटुंबियांचा मृत्यू, मोठ्या भावाची आत्महत्या त्यामुळे कोंडून घेतले होते
नवी मुंबईतील एका ५५ वर्षीय व्यक्तीला गेल्या आठवड्यात त्याच्या अपार्टमेंटमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ स्वतःला कोंडून ठेवल्यानंतर, आणि बाहेरील जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ राहिलेल्या एकाची सुटका करण्यात आली. अनुप कुमार नायर असे या व्यक्तीचे नाव आहे. तो गंभीर नैराश्याने ग्रस्त होता आणि मानसिक आघात आणि नैराश्यामुळे त्याने स्वेच्छेने स्वतःला कोंडून घेतले …
Read More »अटक केली पाकिस्तानी नागरिक म्हणून निघाला दहशतवाद्यांचा मार्गदर्शक लष्करा नियंत्रण रेषेवर केली अटक
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ आणि राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यांजवळील नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आलेला एक पाकिस्तानी नागरिक हा दहशतवादी मार्गदर्शक आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी (३० जून २०२५) सांगितले. मोहम्मद आरिफ हा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या चार दहशतवाद्यांच्या गटाचे नेतृत्व करत होता, तेव्हा रविवारी (२९ जून) …
Read More »वर्षा गायकवाड यांचा इशारा, भाजपा सरकारने पुन्हा सक्तीचे उद्योग करू नये लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा ; महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका महागात पडेल...
राज्यातील महाराष्ट्रद्रोही मराठी विरोधी सरकारला अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याविरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मराठी माणूस एकवटल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान व ओळख मराठी आहे आणि मराठीच राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठीचा आवाज दाबता येत नाही आणि येणारही नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, आरएसएसचा अजेंडा राबविण्यासाठीची हिंदीबाबत जनमत चाचणी मुख्यमंत्र्यांचे ‘एकला चलो रे’ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हिंदी सक्तीची माहितीच नव्हती
हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे. सरकारने हिंदी सक्तीचा शासनआदेश काढून याबाबत जनमत काय आहे हे तपासून पाहिले. महाराष्ट्र या विरोधात ठामपणे उभा राहिला म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर या माध्यमातून सरकारचा नाकर्तेपणा …
Read More »अंदाज समितीनंतर आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातून अशोक चक्र राजमुद्रा गायब अधिवेशनाच्या प्रवेश आणि गॅलरी पासवरून अशोक चक्राची राजमुद्रा गायब
मागील अनेक वर्षापासून भारतीय लोकशाहीतील कामकाजाचे राष्ट्रचिन्ह म्हणून अशोक चक्रधारीत राजमुद्रेचा वापर करण्यात येत आहे. इतकेच केंद्र सरकारबरोबरच आरबीआय बँकेकडून छपाई करण्यात येणाऱ्या नोटेच्या चलनावरही अशोक चक्र आधारीत राजमुद्रेचा वापर करण्यात येतो. मात्र काही दिवसांपूर्वी अर्थात २५ जून रोजी आयोजित दोन दिवसीय अंदाज समितीच्या रौप्य महोत्सवी वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळात साजरा …
Read More »राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, हिंदी नाही हे नक्की, ५ जुलैच्या विजयी मेळाव्याचा तपशील लवकरच तमाम मराठी जणांचे अभिनंदन, मेळाव्यात कोणाचा झेंडा नसेल
राज्य सरकारने पहिलीपासून तीन भाषा शिकवण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात ५ जुलै रोजी जाहिर मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र आगामी …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर
राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये मिळणार सूट एसटी प्रवाशांसाठी योजना १ जुलै पासून सुरू
एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारला पुन्हा इशारा, शिक्षणाचा विषय आहे अशी थट्टा करू नका याप्रश्नी आता अर्थतज्ञांच्या अध्यक्षतेखाली नविन समिती
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ कामकाजात सहभाग नोंदविला. पहिल्या दिवसाचे कामकाजा पहिल्या तास भरातच संपल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, राज्य …
Read More »
Marathi e-Batmya