महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी ५ नंhdjतर झालेल्या ७६ लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहभागी होवून मत मांडावे असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले …
Read More »प्रकाश आबिटकर आणि जयकुमार गोरे यांचे आदेश, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यवाही करा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारिका, एएनएम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समकक्ष पदांवर समावेश करून त्यांना नियमित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या विषयावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत संयुक्त बैठकीत ते …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशन देणार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन
पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेवून ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरेन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच …
Read More »मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून केंद्राच्या एनईपीला एसईपी धोरणाने प्रत्युत्तर केंद्राच्या धोरणात त्रिसुत्री भाषेचे धोरण तर राज्याच्या धोरणात द्विभाषेचे धोरण
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी शुक्रवारी कोट्टूरपुरम येथील अण्णा सेंटेनरी लायब्ररी ऑडिटोरियममध्ये राज्य शिक्षण धोरण (एसईपी) चे अनावरण केले आणि ते केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला (एनईपी) एक स्पष्ट पर्याय म्हणून मांडले. नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी २०२२ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती मुरुगेसन यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी पूर्व नियोजन महत्वाचे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प कार्यशाळेचे उद्घाटन
पूर्व नियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करून सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, ‘चिप मिनिस्टर’ फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील? मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन..
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सुनावणीपासून दूर ठेवा अलाहाबाद न्यायालयाच्या न्यायाधीशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी अभूतपूर्व पाऊल उचलत, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला निवृत्तीपर्यंत फौजदारी खटल्यांच्या सुनावणीपासून काढून दूर ठेवा आणि त्यांना वरिष्ठ न्यायाधीशांसोबत बसवावे, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या आदेशावर चिंता व्यक्त केल्यानंतर हे निर्देश जारी …
Read More »कर्नाटकच्या सरकारला राहुल गांधी यांचे आवाहन, महादेवपुरातील मतचोरीची चौकशी करा कर्नाटकातील निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे मागितली होते पुरावे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, निवडणूक आयोग (EC) इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ शेअर करण्यास नकार देऊन “मोठा गुन्हा लपवत आहे”. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कथित चोरीला आळा घालण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. बेंगळुरू येथील एका …
Read More »डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून राजीनामा देण्याची केली मागणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांच्या चीनमधील कथित व्यावसायिक संबंधांबद्दल राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “इंटेलचे सीईओ अत्यंत गोंधळलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. या समस्येवर दुसरा कोणताही उपाय नाही. या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!” ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया …
Read More »केपीएमजीच्या सीईओ पदी पुन्हा येझदी नागपोरवाला यांची नियुक्ती तीन वर्षासाठी पुन्हा कार्यकाळ मिळणार
भारतातील केपीएमजीने येझदी नागपोरवाला यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती जाहीर केली आहे. नवीन तीन वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होईल, जो त्यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही अखंडपणे सुरू राहील. नागपोरवाला यांची पुनर्नियुक्ती व्यावसायिक सेवा क्षेत्रात जलद परिवर्तनाच्या काळात त्यांच्या स्थिर नेतृत्व आणि दृष्टिकोनावरील कंपनीचा विश्वास …
Read More »
Marathi e-Batmya