Editor

आता जीमेलची आयडी- पत्ता बदलता येणार, गुगल कडून नवे फिचर जुना जीमेल कायम ठेवून नवा जीमेल आयडी बनविण्याची परवानगी

तुम्हाला कधी तुमचा जीमेल पत्ता बदलायचा आहे का? कदाचित तुम्ही तुमचे खाते काही वर्षांपूर्वी तयार केले असेल, आणि आता तो जीमेल पत्ता व्यावसायिक वाटत नसेल? तर, असे दिसते की गुगल लवकरच तुम्हाला तुमचे खाते कायम ठेवून तुमचा जीमेल आयडी बदलण्याची परवानगी देणार आहे. याचा तुमच्यासाठी काय अर्थ असू शकतो, ते …

Read More »

तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी ९४ लाखांचा निधी मंजूर राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत २०२५–२६ या आर्थिक वर्षात हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या तुती बीजकोष व रिलिंग कोष (रेशीम धागा निर्मितीकरिता आवश्यक) यासाठी ९४.०७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग विभागामार्फत शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला. राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना दर्जेदार व रोगमुक्त अंडीपुंज …

Read More »

किटकनाशके साठा व विक्री, घरगुती किटकनाशके विक्री परवाना घेणे बंधनकारक पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स साठीही परवाना आवश्यक

कृषी विभागाकडून मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये किटकनाशके साठा विक्री व घरगुती किटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक विक्रेते घरगुती किटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट, बझार …

Read More »

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला: हर्षवर्धन सपकाळ

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीला विज्ञान क्षेत्रासाठी पुरस्कार

वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादांच्या शौर्याला नमन

शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी …

Read More »

वोलोदिमिर झेलेन्सी यांनी व्यक्त केली व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूची इच्छा नाताळच्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ख्रिसमसच्या संध्याकाळी युक्रेनच्या जनतेला संबोधित करताना, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे नाव न घेता, त्यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त केली. ख्रिसमसच्या काळात रशियाने युक्रेनवर हल्ले केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरली. ‘स्वर्ग उघडतो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनियन दंतकथेचा संदर्भ देत वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले, “प्राचीन …

Read More »

बांग्लादेशात अमेरिकेच्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या लढ्याचा संदर्भ माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे सुपुत्र रहमान यांनी लोकशाही बांग्लादेशाची केली मागणी

माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र आणि बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) चे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांनी जवळपास दोन दशकांच्या वनवासानंतर देशात परतल्यानंतर बुधवारी ढाका येथे एका विशाल सभेला संबोधित केले. समर्थकांच्या अथांग जनसमुदायाच्या उपस्थितीत दिलेल्या भाषणात, रहमान यांनी बांग्लादेशसाठी आपली दूरदृष्टी मांडली आणि दिवंगत अमेरिकन नागरी हक्क नेते मार्टिन …

Read More »

थायलंड-कंबोडियन सीमावर्ती भागातील ती मुर्ती बुलडोझरच्या सहाय्याने पाडली ती मुर्ती भगवान विष्णूची की गौतम बुद्धांची, पण भारत सरकारकडून नाराजी व्यक्त

थायलंड आणि कंबोडिया दरम्यान मागील काही महिन्यांपासून एकमेकांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात येत होती. मात्र आता थायलंड आणि कंबोडियाच्या सीमावर्ती भागात उभारण्यात आलेली एक मुर्ती कोणी त्याला हिंदू धर्मातील विष्णूची तर काही जणांकडून ती तथागत गौतम बुद्धांची असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता थायलंड सरकारने ही मुर्तीच बुलडोझरच्या सहाय्याने …

Read More »

अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहिर महानगरपालिकांसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक मैदानात ; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केली यादी

राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहिर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री …

Read More »