मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १६२(२) अंतर्गत अनिवार्य केलेल्या “गोल्डन अवर” – अपघातानंतर लगेचच एक तासाचा कालावधी – दरम्यान रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचारांसाठी योजना तयार करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज (९ एप्रिल) केंद्र सरकारला फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “आमच्या मते हे केवळ या न्यायालयाच्या आदेशांचेच …
Read More »जनसुरक्षा कायद्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा नाही देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरुद्धच विशेष जनसुरक्षा कायदा
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला विशेष जनसुरक्षा कायदा हा देशांतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळे पत्रकार किंवा कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला कोणताही त्रास होणार नाही, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा पोहोचणार नाही. हा कायदा व्यक्तींसाठी नसून देशविघातक कृत्ये करणाऱ्या संघटनांविरुद्ध असल्याची नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात सूचना घ्या
राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री …
Read More »बंधू राज, मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली शंका
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद सुरू झाला. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उडी टाकली आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही ना …
Read More »सुप्रिया सुळे यांचा निर्धार, जोपर्यंत वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार श्रीक्षेत्र बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळें यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडं जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याचं क्रॉंक्रिटीकरण करावं, यासाठी सातत्यानं पाठपुरावा होऊनही या रस्त्याचं काम सुरु झालं नाही. याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहे. …
Read More »रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आज महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. या जमिनींच्या जवळ पारंपरिक जुनी मंदिरे व धार्मिक स्थळे असून, त्यावर विविध विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले …
Read More »लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर आणि खानगाव उपबाजारासाठी जागा छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आणि समीर भुजबळ यांच्यात चर्चा
लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजारासाठी सुभाष नगर येथे ०८ हेक्टर ६१.५६ आर तर खानगाव नजिक येथील उपबाजारासाठी ३.५० हेक्टर जमीन बाजार समितीस उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच बाजार समितीला जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच लासलगाव येथील ‘ब’ सत्ताप्रकार मिळकती क …
Read More »संजय निरूपम यांची टीका, काँग्रेस मानसिक दिवाळखोर झालीय निवडणूक निकालांवर टीका करण्यापेक्षा पराभवाचे विश्लेषण करा
एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याने काँग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालीय अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला, त्यावर निरुपम यांनी सडकून टीका केली. संजय निरुपम पुढे म्हणाले की, भारतीय मतदारांचा विश्वास संपादन करण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली …
Read More »दीपक केसरकर यांची टीका, कोकणी माणसावर उबाठाचे बेगडी प्रेम कोकणी जनता मूळ शिवसेनेसोबतच असल्याचे निवडणुकीतून शिक्कामोर्तब
मुख्यमंत्री असताना कोकणच्या भल्याचा एकही निर्णय न घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावर बेगडी प्रेम असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकताच उबाठा नेतृत्वाने पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करण्याचे जाहीर केले. या वक्तव्याचा केसरकर यांनी खरपूस …
Read More »२५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच ‘एचएसआरपी’ विनाशुल्क बसविण्याचा परिवहन विभागाचा निर्णय
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना, सोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांनी निवासस्थानी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा निवासी कल्याण संघटना, सोसायटीमध्ये वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची एकत्रित बुकिंग केल्यास कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क …
Read More »
Marathi e-Batmya