Breaking News

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड आणि बारामतीचे मतदान होणार असून उद्या या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मुस्लिम महिलांच्या ट्रस्टची जमिन हडपण्याचा डाव…

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टची जमीन हडपण्यामागे आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी डॉ. उंद्रे यांनी …

Read More »

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पाडण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले. १० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही …

Read More »

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब पडघे-कळवा सर्किट-१ मध्ये भार वाढल्यामुळे ठाणे, कळवा, वाशी, कलरकेम, महापे व टेमघर या परिसरात १६० मेगावॉट इतके विजेचे भारनियमन करावे लागले. महापारेषणची सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यान्वित झाल्याने वीजपुरवठा तातडीने पूर्ववत झाला. दरम्यान, महापारेषणचे अध्यक्ष व …

Read More »

एकनाथ खडसे यांची अवस्था ना घर…, महाजनांच्या त्या वक्तव्यामुळे शिक्कामोर्तब ?

राज्यातील भाजपाचे जूने वरिष्ठ नेते तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळचे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते. परंतु भाजपात असताना राज्यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुप्त संघर्ष सुरु झाला अन त्यात त्यांना मंत्रिपदाची खुर्ची सुरवातीला सोडावी लागली. त्यानंतर भाजपाही सोडावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद …

Read More »

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.अखिलेश चौबे यांनी ही माहिती …

Read More »

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८-१९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार ४५७ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. मुख्य निवडणूक …

Read More »

दुबईच्या वाळवंटात पावसाचा महापूर…विमानतळ, रस्ते, मॉल्समध्ये पाणीच पाणी

आतापर्यंत दुबई आणि बहरीन हे तेथील राजेशाही राजवट आणि तेथील वाळवंटी भूभाग, त्याचबरोबर तेथील कच्च्या तेलाचे साठे यामुळे संपूर्ण जगभरात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनलेले आहे. परंतु कालपासून या भागात वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते, घरे आणि मॉल्समध्ये पाणी भरले असून ओमानमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यास अवधी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना या सर्वच राजकिय पक्षांकडून राजकीय प्रचार, रॅली आणि रोड शो आयोजन करण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी हमी, धर्म, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींवरून उमेदवारांवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी …

Read More »