Breaking News

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा तिसरी लाट येवू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राज्यात दहि हंडी उत्सवाला परवानगी संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणसुद, उत्सव थोडेसे बाजूला ठेवून कोरोनाची लाट थोपविण्याच्यादृष्टीने काळजी घेवू असे आवाहन दहिहंडी पथकांना केले. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा इशारा देत देशातील …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांचा मोठा निर्णय: सरकारी अधिकाऱ्यांच्या वारसास मिळणार नोकरी राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी सरकारी नोकरीत असलेल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याचा नोकरीत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियातील एकाच नोकरी देण्याचे सरकारी धोरण आहे. मात्र आता या धोरणाची व्याप्ती वाढवित अ आणि ब श्रेणीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नोकरीत असताना मृत्यू झाला तर आता त्याच्या कुटुंबियातील एकास सरकारी नोकरीत अनुकंपाखाली नोकरी देण्याचा …

Read More »

बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? भाजपा आमदार गोपीचंद पडकरांची शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊतांवर टीका

सांगली-मुंबई: प्रतिनिधी आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असा खोचक सवाल करत असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत …

Read More »

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही नसल्याचे सांगत भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना दिलेल्या धमक्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले. भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. …

Read More »

शिवसेना आमदार दानवेंनी काढली भाजपाच्या दाव्यातील हवा ते वक्तव्य पालघर निवडणूकीच्या वेळचे

औरंगाबाद-मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अवमान करणारे वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यास सुरुवात झाली. मात्र भाजपाकडून करण्यात येत असलेला तो आरोप उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना केला नसून तो मुख्यमंत्री होण्याआधी पालघर येथील पोटनिवडणूकीत केल्याचा दावा शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास …

Read More »

योगी आदित्यनाथ यांचा अवमान केल्याप्रकरणी आता भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी यवतमाळ पाठोपाठ नाशिकमध्येही अर्ज दाखल

नाशिक-मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर आता भाजपाकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून यवतमाळमध्ये तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर आता नाशिकमध्येही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार …

Read More »

अनिल परबांच्या त्या क्लिपची सीबीआय चौकशी करा संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहते ? आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक झालेली नव्हती, त्यापुर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब दूरध्वनीवरुन अनेक संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनी फित समोर आली आहे. राणे यांच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेवर  दबाव आणत होते, न्यायालयाबाबत काही गंभीर विधाने करुन अपमान करीत असल्याची व्हिडीओ क्लीप समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत …

Read More »

जमिनी दिलेल्या या प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकऱ्या तिन्ही कंपन्यात सामावून घेण्याचा प्रस्ताव सादर करा- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : प्रतिनिधी वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमीनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी महानिर्मितीच्या पातळीवर ठेवण्यात येते तसेच महानिर्मितीमधील तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी या उमेदवारांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. तथापि, या उमेदवारांना लवकरात लवकर नोकरीची संधी मिळावी यादृष्टीने महानिर्मिती, महावितरण तसेच महापारेषण या तिन्ही कंपन्यांनी सामावून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करुन एमएसईबी सूत्रधारी कंपनीकडे सादर करावा, असे निर्देश …

Read More »

नाशिक गुन्हेप्रकरणात नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा तुर्त दिलासा १७ सप्टेंबर पर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणात १७ सप्टेंबर पर्यत कोणतीही कारवाई करून नये असे आदेश नाशिक पोलिसांना देत मुंबई उच्च न्यायालयाने राणे यांना तात्पुरता दिलासा दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी …

Read More »

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश शालेय आणि कृषी विभाग तयार करणार अभ्यासक्रम-शालेय शिक्षणमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या …

Read More »