मुंबई : प्रतिनिधी लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या सुविधेसोबतच मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब देखील सुरू करण्यात आली असून …
Read More »ओबीसी आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला जात नसल्याबाबत एका मंत्र्याची दुसऱ्या मंत्र्याबद्दल खंत
मुंबईः विशेष प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे संपुष्टात आलेले ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळविण्याच्या उद्देशाने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आग्रही असताना ओबीसी समाजाचा दुसरा एक मंत्री मात्र उदासीन पध्दतीने वागत आहे. या मंत्र्याचे करायचे तरी काय असा प्रश्न राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याला पडला असून त्या मंत्र्यांमुळे …
Read More »टीका करण्यापेक्षा पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडा प्रविण दरेकर यांचा नवाब मलिकांना टोला
मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांवर टीका केली. या टीकेवरून भाजपा नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला. राज्यपालांनी जिल्ह्यांचे दौरे केले तर यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचे …
Read More »खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची घणाघाती टिका
नंदुरबार: प्रतिनिधी राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल अशी अहिराणी भाषेत टीका आज भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली. आमदार अॅड आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून नंदुरबार जिल्हा दौऱ्यात …
Read More »नाना पटोले यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आदेश, कामाला लागा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई: प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग …
Read More »आणि चक्क राज्यपाल कोश्यारींनी स्विकारला मुख्यमंत्र्यांचा पहिला सल्ला निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे राज्याचे नवे लोकायुक्त
मुंबई: प्रतिनिधी सत्तेत स्थानापन्न होवून दिड वर्षे पूर्ण होत आले तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात अनेकविध विषयावरून संघर्ष सुरु असल्याचे चित्र राज्यातील जनतेला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे दिसत असतानाच मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या निवृत्त न्यायाधीशाच्या निवडीला राज्यपालांनी पसंती …
Read More »पूरग्रस्त दुकानदार, मच्छिमार,सर्वसामान्य, कारागीरांना असे होणार ११ हजार ५०० कोटींचे वाटप आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली असून, यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. आपत्तीग्रस्त नागरीकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय कृषी विद्यापीठाच्या शिक्षकांना ७ वा वेतन
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून ११ हजार ५०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्यानंतर राज्यात जालना जिल्यात सर्वाधिक मोठे असे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय कृषी विद्यापाठाच्या अध्यापकांना ७ वा वेतन आयोगासह संग्रहालयासाठी शासन जमिन मोफत देण्याचा निर्णय आजच्या महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …
Read More »पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत : बचावासाठी संरक्षण भित उभारण्याचे निर्देश सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वार्यावर न सोडता मदत केली. आजही ११ हजार ५०० कोटीच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त परिस्थितीवर …
Read More »नवाब मलिक म्हणाले, तुम्ही राज्यपाल आहात मुख्यमंत्री नाही विभाग आणि राज्य सरकारला न विचारताच राज्यपालांकडून उद्घाटनाचा कार्यक्रम जाहिर
मुंबई: प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल असा सामना सातत्याने राज्यातील जनतेला पाह्यला मिळत असून या संघर्षातील आता नवा अंकाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. अल्पसंख्याक विभागाने बांधलेल्या वसतिगृहांच्ंया उद्घाटनाचा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग यांनी परस्पर जाहिर केला असून त्यासाठी ते विमानाने ५ तारखेला नांदेड, …
Read More »
Marathi e-Batmya