Breaking News

अवरेज वीज बीलाची फडणवीसांची तक्रार, विधानसभाध्यक्षांचे तातडीने आदेश पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी आदेश दिले

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावेळी एक पुस्तिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पुस्तिका प्रसिध्द केली. त्या पुस्तकात मुख्यमंत्री लिहितात कि, वर्षभरात सर्व मंत्र्यांनी एकदिलाने एक संवादाने निर्णय घेण्यास सहकार्य केले. मात्र वीज बील सवलतीच्या घोषणेबाबत विसंवाद का असा सवाल उपस्थित करत ज्यांचे घर पुरात …

Read More »

सभागृहातच मुनगंटीवारांनी दिली शिवसेनेच्या आमदाराला मंत्री पदाची ऑफर विधानसभेत चर्चेच्यावेळी दिली

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेत शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्याने सर्वाधिक आमदार असूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. मात्र प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाला मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रस्तावावरील चर्चे दरम्यान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्याच आमदाराला भर विधानसभेत मंत्री पदाची ऑफर दिल्याने क्षणभर सभागृहही बुचकाळ्यात पडले. अभिनेत्री कंगणा राणावत …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरसह राज्यात मृतकांमध्ये घट, कोल्हापूरात शून्य नोंद २ हजार ९४९ नवे बाधित, ४ हजार ६१० बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एकाबाजूला नवे बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असताना दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्याचबरोबर मृतकांची नोंद आता हळू हळू कमी होत आहे. मुंबईत ७ मृतकांची तर महानगरात ६ असे मिळून ठाणे विभागात अवघ्या १३ मृतकांची नोंद झाली आहे. पुणे विभागात ७, नाशिक …

Read More »

निवडणूकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर या गोष्टी पुरावा म्हणून चालतील महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर …

Read More »

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ६ हजार कोटींची तरतूद : वाचा कसे केले निधीचे वाटप २२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेच्या पटलावर

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विविध विभागाच्या खर्चासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रूपये प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी २ हजार ८५० कोटी रूपयांची तर अतिवृष्टीमुळे आणि पूरबाधितांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी २ हजार २११ …

Read More »

लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम; राज्यपालांना सांगा की ती यादी मंजूर करायला भाजपाच्या मुनगंटीवारांच्या मागणीवर सांसदीय कार्यमंत्र्यांचे प्रतित्त्युर

मुंबई : विशेष प्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी विधिमंडळाकडून विविध समित्या तयार करण्यात आल्या. मात्र या समित्यांच्या बैठका अद्याप आयोजित केली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत सरकार लोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी केला. त्यावर सांसदिय मंत्री अनिल परब यांनी आम्ही बैठकांचे आयोजन …

Read More »

अधिवेशनाच्या कालावधीवरून विधानसभाध्यक्षांनीच सभागृहातच व्यक्त केली नाराजी सत्ताधारी विरोधकांनी मिळून नियमावली तयार करण्याचे आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीवरून आधीच विरोधकांकडून टीका करत असताना आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून नाराजी व्यक्त करत नियमित अधिवेशन घेण्याच्या अनुषगाने सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून एकत्रित नियमावली तयार करावी असे आदेश दिले. अधिवेशनाच्या कालावधीवरून अध्यक्षांनीच आता स्पष्ट नाराजी व्यक्त …

Read More »

उस्मानाबादच्या युवकांकडून शरद पवारांचे असे ही ५ एकरात अभिष्टचिंतन शरदचंद्रजी पवार फाउंडेशन उस्मानाबाद

उस्मानाबाद: प्रतिनिधी शरदचंद्रजी पवार फाउंडेशन उस्मानाबाद अध्यक्ष शेखर घोडके उपाध्यक्ष रणविर इंगळे, सचिव डॉक्टर सुरज मोटे यांच्या मार्गदर्शना मध्ये फाऊंडेशनचे सदस्य मंगेश निपाणीकर (कलाकार) व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवस कष्ट करून पाच ऐकर क्षेत्रांमध्ये आदरणीय साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ग्रास पेंटिंग करून प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न.यामध्ये फाउंडेशनचे सदस्य …

Read More »

फडणवीसांची पत्रकार परिषद, जोश नसलेली आणि पडलेल्या चेहऱ्याची होती अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहिली. मात्र त्यात कोणत्याही प्रकारचा जोश नव्हता. तेथे उपस्थित असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही चेहरा पडलेला आणि डिमोरलाईज झालेले दिसत होता अशी उपरोधिक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपा नेते फडणवीसांचे आरोप म्हणजे …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अघोषित आणि केंद्राची काय घोषित आणीबाणी ? फडणवीसांना खोचक प्रतित्तुर ; मांडण्यात येणारे अध्यादेश आणि विधेयकांची यादी

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करायला जात नाही. उलट या कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारत आहेत. तेथील परिस्थिती जावून पाहण्यापेक्षा राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मग केंद्राने काय घोषित आणीबाणी सुरु …

Read More »