Breaking News

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिल्या या सवलती : १५ ऑक्टोंबरपासून सुरु होणार अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत देण्यात येईल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिंडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड)चे वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स …

Read More »

अल्पसंख्याकांचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढविण्यासाठी योजना : शासन निर्णय जाहीर कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रति महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. …

Read More »

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण नसल्यामुळे आणि आम्ही टोपलं दिलं तरी उचलू या मानसिकतेमुळे कोणी ऑफिसातल्या मऊ गादीवर आपलं हडकुळ बूड टेकवू शकलं नाही. आणि गाव वाले आपल्याला नोकरी मिळाली बाकी ठेकेदार किती घेतो ? काय करतो ? याचं कोणाला काही पडलेलं …

Read More »

कोरोना : मुंबई ठाणे आणि पुण्यासह राज्यात बाधित संख्येत घट; २४ तासात सर्वाधिक मृतकांची नोंद १२ हजार २५८ नवे बाधित, १७ हजार १४१ बरे झाले तर ३७० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात प्रामुख्याने चिंतेचा विषय बनत चालेल्या मुंबई शहरासह ठाणे, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या. मात्र मागील काही काही दिवसांपासून मुंबई वगळता ठाणे आणि पुणे जिल्ह्यात संख्येत चढउतार होत असल्याचे पाह्यला मिळत होते. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी २००० हजाराच्या आत संख्या आढळून आली आहे. तर ठाणे जिल्ह्यातही आज बाधित …

Read More »

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केल्या या सूचना केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर कराव्या लागणार –मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी कृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या अधिक मजबूत कराव्यात, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे पाहून हमी भावाचे संरक्षण काढून घेऊ नये, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिकचे  कायदे करावे, करार शेतीमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे, हमी भावापेक्षा कमी किमतीत कोणाला शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी, …

Read More »

आता राज्य सरकारचेही “कोविड कवच ॲप” सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा - अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

सुशांतसिंग राजपुतप्रकरणातील फेसबुक आणि ट्वीटर फेक अकाऊंटचे मालक कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप करत …

Read More »

क्लार्क पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करण्याचा विचार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, …

Read More »

शब्द प्रभू रामाजी हिंगे संवेदनशील नाट्य-टिव्ही अभिनेता अकुर विठ्ठलराव वाढवे यांची वास्तववादी कल्पनाधारीत कथा

मोठा बेलोरा हे पुसद तालुक्यात येणारे गाव. आता गावं म्हटलं की व्यक्ती तेथे प्रवृत्ती आल्याच. बेलोऱ्यात बारावी पर्यंत शाळा आहे. पण सगळीच मुलं शाळेत जायची असं नाही. शाळेत न जाणारी आणि काम न करणारी तरूण मुलं (खरं तर सगळ्यांनाच कामं असायची असं पण नाही) हे सगळे समाज मंदीरावर बसून पत्त्याचा …

Read More »

कोरोनाचा जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प खालापूरला स्थलांतरीत करणार आराखडा सादर करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी गोवंडी येथील नागरिकांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्याची मागणी आहे. याअनुषंगाने तसेच परिसरातील प्रदुषण समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. आमदार अबु असीम आझमी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार …

Read More »