Breaking News

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही. मात्र कला हीच …

Read More »

दिलासादायक : मातामृत्यू कमी असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र २ ऱ्या स्थानी युनोच्या शाश्वत विकास ध्येयाची (एसडीजी) महाराष्ट्राने केली पूर्तता

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असताना राज्यासाठी सुखावणारी वार्ता सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) आज प्रकाशित झालेल्या अहवालातून समोर आली असून मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत यावेळेसही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवित सातत्य राखले आहे. राज्यात आरोग्य विभागामार्फत मातामृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने हे यश मिळविले आहे. केंद्रीय …

Read More »

बदनामी केलात, चंद्रकांतदादा पाटील माफी मागा नाही तर दिलगीरी व्यक्त करा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमोओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदीक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती सांगून लोकांची दिशाभूल केली. माझी तसेच शासनाची बदनामी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी माफी …

Read More »

SC-ST विद्यार्थ्यांकडून वाढीव फि घेणाऱ्या संस्थावर कारवाई करा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनामुळे सर्वच गोष्टी बंद असताना अनेक महाविद्यायांच्या इमारती, तेथील वसतिगृहे रूग्णांवरील उपचारांसाठी सरकारनेच ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होतील याची कोणतीही शाश्वती नसताना अनेक महाविद्यालयांनी मात्र फि वसूली करण्यास सुरुवात केली असून राज्यातील SC-ST च्या विद्यार्थ्यांकडून निर्धारीत केलेल्या फि पेक्षा वाढीव फि महाविद्यालयांनी …

Read More »

१२ वीच्या निकालात गतवर्षीपेक्षा यंदा ४.७ टक्क्याने वाढ सर्वाधिक निकाल कोकण तर सर्वात कमी औरंगाबादचा निकाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १२ वी परिक्षार्थींचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी १२ वी निकालात ४.७ टक्केने वाढ झाली आहे. या निकालात कोकणने बाजी मारली असून राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबादचा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

गृह मंत्री देशमुख म्हणाले, या ऑनलाईन चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला रझा अकादमीच्या तक्रारीवरून केंद्राला लिहिले पत्र

मुंबई : प्रतिनिधी सध्या काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मुहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मात्र या चित्रपटामुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपट ऑनलाईन दाखविण्यावर बंदी घालावी अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहित केंद्रीय आयटी मंत्र्यांकडे केली. मुहम्मद द मेसेंजर ऑफ …

Read More »

पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, साहित्यिक नीला सत्यनारायण यांचे निधन कोरोना विषाणूमुळे मृत्यू : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शोक

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त ठरलेल्या आणि आपल्या आगळ्यावेगळ्या कवितांमुळे साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचे आज पहाटे ४ निधन झाले. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात …

Read More »

Z.P च्या प्राथमिक शिक्षक आणि ३, ४ श्रेणीतील बदल्या १५ टक्क्यांच्या मर्यादेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे या वर्षाच्या …

Read More »

आता मास्क, सॅनिटायजरची किंमत निश्चित होणार आरोग्य मंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील …

Read More »

कोरोना: ७९७५ सह रुग्ण संख्या पावणेतीन लाखावर तर मुक्त झाले दीड लाख ३६०६ बरे होवून घरी तर २३३ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे. तर ७९७५ नव्या बाधित रूग्णांमुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या २ लाख ७५ हजार ६४० वर पोहोचली आहे. तर बाधित रूग्णांची संख्या …

Read More »