पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १५०० एकर मिठागरांची …
Read More »मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार केला कमी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार कमी केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेने दिली आहे. तर पश्चिम रेल्वेने मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत कारवाईची माहिती दिली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणी स्थापन केली समिती दोन निवृत्त महिला न्यायाधीशांसह माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती
बदलापूर येथील शाळेच्या दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्वत:च्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना ‘बेटा पढाओ और बेटी बचाओ’ असे म्हणत महाराष्ट्र सरकारने मुलांना योग्य आणि अयोग्य शिकवलेच पाहिजे, असा पुनरुच्चार करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने लहान वयातच मुलांना महिला आणि मुलींचा आदर …
Read More »मंत्रालयातील स्वेच्छानिवृत्तीनंतर सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा शिवसेना प्रवेश मेहकरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता
राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे असताना मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आता राजकारणाची वाट धरली आहे. मंत्रालयात ३ दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) या पदावर पोहोचलेले सिद्धार्थ खरात यांनी अलिकडेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर आज मंगळवारी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील …
Read More »एसटी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांचा संप; २०० डेपोतील एसटीच्या वाहतूकीला ब्रेक शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यावर तोडगा निघेपर्यंत संप सुरुच राहणार
राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यावरती अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीचे निमंत्रक मुकेश तिगोटे यांनी माहिती दिली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक दिल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सणासुदीच्या तोंडावर …
Read More »२७ वी ई-गव्हर्नन्सविषयक राष्ट्रीय परिषद मुंबईत दोन दिवस चालणार राष्ट्रीय परिषद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा मुंबई येथे प्रारंभ होत आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (डीएआरपीजी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने ३ …
Read More »ठाणे मध्ये विविध समाजासाठी एकाच इमारतीत १२ समाज भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण,भूमीपूजन
एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमीपूजन समारंभात केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि …
Read More »वांद्रे पश्चिम येथे उभ्या राहणाऱ्या “बॉलीवूड थिम” चे भूमीपूजन भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांच्या हस्ते कार्यक्रम
वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन २ बी च्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान बॉलीवूड थिम साकारण्यात येणार असून आज या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. मेट्रोलाईन 2बी च्या एकुण ७ स्टेशन व त्यामधील सुमारे ३५० खांब व त्यामधील जागे मध्ये एमएमआरडीए मार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्यावात तंत्रज्ञानाचा वापर …
Read More »गणेशोत्सवात मुंबईतील या १२ पुलांवर अती गर्दीस मुंबई पालिकेचा मज्जाव मंडळांना मिरवणूकीसह गणेशविसर्जनासाठी रहदारीस बॅन
गणेशोत्सवास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाच मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळासाठी शहरातील १२ पुलांवरून गर्दी करण्यास आणि मिरवणूका, गणेश विसर्जनासाठी वापरू नये असे आवाहन केले आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भाविकांना मिरवणुका काढताना मुंबईतील १२ पुलांवर जमू नये, असेही जाहिर केले आहे. दक्षिण मुंबईतील दादर आणि …
Read More »एस चोकलिंगम यांचे आवाहन, भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचा अभ्यास करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे व कोकण विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत यशदा येथे करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा व्यवस्थित अभ्यास करावा, असे …
Read More »
Marathi e-Batmya