दहशतवादी गटाला मदत केल्याबद्दल तीन बांग्लादेशींना ५ वर्षांची शिक्षा एनआयए न्यायालयाचा निर्णय

दहशवादी संघटना अल-कायदाची आघाडीची संघटना असलेल्या अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) च्या सदस्यांना प्रोत्साहन आणि मदत केल्याच्या आरोपाखाली विशेष एनआयए न्यायालयाने गुरुवारी तीन बांग्लादेशी नागरिकांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसैन खान आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरविण्यात आले. ऑक्टोबर २०२३ मध्ये, न्यायालयाने या प्रकरणात आणखी दोन आरोपींना दोषी ठरवून त्यांनाही पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

फिर्यादीनुसार, अनेक बांग्लादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहात असल्याच्या माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी मार्च २०१८ मध्ये गुन्हा नोंदवला होता. पुण्यातील धोबीघाट, भैरोबा नाला येथे पोलिसांनी हबीबला अटक केली आणि त्यानंतर या प्रकरणात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली. मे २०१८ मध्ये या प्रकरणाचा ताबा घेणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिकांनी भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून राहत असल्याचे आढळून आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका इत्यादी मिळवले होते आणि त्यांचा वापर भारतीय सिमकार्ड मिळविण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी तसेच नोकरी मिळविण्यासाठी केल्याचा दावाही एनआयएने तक्रारीत केला आहे. तपासात पुढे सर्व आरोपी अनेक एबीटीच्या सदस्यांच्या संपर्कात असून त्यांना आश्रय आणि निधी दिल्याचेही आढळून आल्याचे एनआयएने म्हटले आहे.

About Editor

Check Also

समुद्रात शनिवारी झाला कमी तीव्रतेच्या भूकंप; त्सुनामीचा कोणताही धोका नाही किनारपट्टीवरील नागरिक - पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन, अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *