मागील १० ते १२ वर्षात देशाचे राजकारणा हिंदू-मुस्लिम अजेंड्याभोवती फिरत आहे. मात्र या मुद्यामुळे तरूणांना नोकऱ्या मिळणार नाहीत. आता देशाचे राजकारणाचा रोख बदलून रोजगार आणि शिक्षण सारख्या महत्वाच्या विषयावर येणे गरजेचे असल्याची भूमिका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मांडली.
दिल्लीतील जंतर-मंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आज सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना वरील भूमिका मांडली. यावेळी नीट आणि सीबीएसई परिक्षेच्या गोंधळावरून केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशी यावेळी लावून धरली.
यावेळी बोलताना अभिजित दिपके पुढे म्हणाले की, देशातील तरूणांसाठी शिक्षण आणि रोजगारहे सर्वोत मोठे प्रश्न आहेत. केंद्र सरकारने प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, परिक्षेतील घोटाळ्यावरून केंद्रावर निशाणा साधताना म्हणाले, खआजगी कंपन्यांमध्ये चुका झाल्यानंतर कामावरून काढून टाकले जाते. मग सरकारी परिक्षांचे पेपर वारंवारलीक होऊनही इथे जबाबदारी कोणीच का घेत नाही , जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत सरकारला आपल्या चुकांची जाणीव झाली आहे, असे आम्ही कशावरून मानायचे असा सवाल करत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही येळी दिला.
जंतर मंतर वरील आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके यांनी कडक शब्दात उत्तर देताना म्हणाले की, दरवेळी आंदोलन विद्यार्थ्यांना विरोधकांना आणि माध्यमांना प्रत्येकवेळी पाकिस्तानी म्हटले जाणार का सत्ताधारी पक्षाचे आयटीसेल चावलणारेच काय फक्त भारतीय आहे का असा सवालही यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, नेपाळ किंवा बांग्लादेशमधील सत्तांतराच्या आंदोलनाशी या आंदोसनाची तुलना करणे चुकीचे असल्याचे सांगत भारतात एक लोकशाही व्यवस्था आहे. आमचे जंतर मंतरवरील आंदोलन अंत्यत शांततापूर्ण होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून तरूण सहभागी झाले होते, आमची पुढील आंदोलनेही अशाच प्रकारे शांततेच्या मार्गाने आणि मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट केले.
अभिजीत दिपके म्हणाले की, हा लढा राजकिय नाही कॉकरोच जनता पार्टी पूर्णपणे स्वंतत्र संघटना आहे. हे आंदोलन जेन झी म्हणजे आजच्या तरूण पिढीसाठी आहे. कोणत्याही राजकिय पक्षाने याला बाहेरून पाठिंबा दिला तर त्याचे स्वागतच आहे. परंतु आम्ही कोणत्याही राजकिय पक्षाशी आघाडी किंवा युती करणार नसल्याचे यावेळी सांगितले.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या दिवशी शनिवारी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉकरोच यांना अराजक असल्याचे टीका केली होती. त्यावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे काही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नाहीत. तर पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि वैचारीक वारसा सांगणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते काय बोलतात ते त्यांना चांगलेच माहित आहे. जी मुलं जयभिमचे नारे देतायत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देतायत आणि त्यांचे फोटो झळकावित आहेत, ती आंदोलनकर्ती मुलं अराजक कशी असतील असा सवालही यावेळी केला.
Marathi e-Batmya