अमित शाहंच्या त्या कौशल्याची आम्हीही वाट पाहतोय शरद पवारांची मिश्किल टिपण्णी

मुंबईः प्रतिनिधी
कोणत्याही राज्यात निवडणूका झाल्या की, तेथे जर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर भाजपाध्यक्ष अमित शाह हे सरकार स्थापन करून दाखवतात. आम्हीही त्यांच्या या कौशल्याची वाट पाहतोय अशी कोपरखळी वजा टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
नवी दिल्लीतील पोलिसांनी काढलेल्या मोर्च्यावर देशातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
त्यावेळी भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अपुऱ्या संख्याबळ असताना बहुमतातील सरकार स्थापन करण्याबाबत विशेष कौशल्य असल्याची बाब यावेळी पत्रकारांनी उपस्थित केली. त्यावर बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
मागच्या काही काळात अनेक राज्यात बहुमत नसतानाही अमित शाह यांनी सत्ता स्थापन केली, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी पवार यांनी विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, “असं आहे, त्यांच्या या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेनं वाट पाहत आहोत. त्यांनी सरकार बनवावं,” असं खास पवार शैलीतलं उत्तर त्यांनी दिलं. “संख्याबळ असतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केलं असतं असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणून टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे गांधी भवनात जावून निदर्शने

ये ‘गुंगी गुडिया नही ये ‘आंधी’ है… हर्षवर्धन सपकाळ हाय हाय… हर्षवर्धन सपकाळ माफी मागा… …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *