सरकारचा मोठा निर्णय : पोलिस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा बाजूला काढणार गृहमंत्री अनिल देशमुख ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात पोलिसांच्या १२ हजार ५०० जागा भरण्यात येणार आहेत. मात्र या जागा भरताना मराठा समाजाला आरक्षणातर्गत येणाऱ्या १३ टक्के जागा वेगळ्या काढणार असून त्यातील कायदेशीर बाबी जागा भरून मराठा समाजातून त्या भरणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटरवरून दिली.

आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने-मोर्चाची हाक देण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील अनेक भागात आंदोलने करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीनप त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तसेच हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया राबविताना १३ टक्के जागा बाजूला काढण्यात येणार आहे. तसेच कायदेशीर बाबी तपासून त्या मराठा समाजातून भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *