मुख्यमंत्री मस्तवाल झालेत; त्यांना फक्त भाजप व निवडणूका दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणूका या व्यतिरिक्त काही दिसत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा समाचार घेतला.
पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाने हाहाकार उडाला असून त्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे नाशिक येथे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हयात झालेली पुरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन झोपलेले होते. ही परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आणि पालकमंत्री यांचे आहे. परंतु हे लोक दिल्लीत जावून बसतात असा टोलाही त्यांनी लगावला.
जनतेवर कितीही संकटे आली तरी याची चिंता यांना नाही. त्यांना चिंता फक्त निवडणूकीत सत्तेत येणं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *