योगीजी “त्या” प्रकरणात आम्ही कठोर कारवाई केलीय तुम्हीही कराल साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उ.प्र. मुख्यमंत्री आदीत्यनाथ यांच्याजवळ व्यक्त केली चिंता

मुंबई: प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली. तसेच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातही अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी संबधित गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदीत्यनाथ यांना दिली.
या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्यारितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलदंशहर प्रकरणी देखील दोषींना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करत कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही केले.

About Editor

Check Also

डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने अभ्यासू, संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण- हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *