धर्मा पाटील प्रकरणाचा अहवाल ८ दिवसात सादर करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबईः प्रतिनिधी

जळगावमधील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुक्य सचिवांकडून चौकशी केली जाणार असून येत्या आठ दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. धर्मा पाटील यांचे प्रकरण घडले तेव्हा मुख्यमंत्री डाव्होसच्या परिषदेच्या घाईत होते. त्यामुळे मंत्रालयात नेमके काय घडले याची पूर्ण कल्पना येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या साऱ्या घडामोडींची चौकशी करण्यास सांगितले आहे. नुकसानभरपाई देताना भेदभाव कसा झाला, कोणी केला, याला जबाबदार कोण, महापोर्टलवर नेमके काय झाले, या साऱ्याच घटनाक्रमाची चौकशी आता राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक करणार आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यावर येणाऱ्या निष्कर्षांनुसार जबाबदार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *