पन्नास खोके… चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा... नाहीतर खुर्च्या खाली करा...महाराष्ट्र के गद्दारों को जुते मारो सालों को...

पन्नास खोके चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा… नाहीतर खुर्च्या खाली करा… महाराष्ट्र के गद्दारों को जुते मारो सालों को… गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…ईडी सरकार हाय हाय… पैसा आमच्या जनतेचा… नाही कुणाच्या बापाचा… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकारचा निषेध असो… सातवा वेतन न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…बलात्कारांचा सत्कार करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा गगनभेदी घोषणा देत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

About Editor

Check Also

क्रीडा आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीचा लाभ घ्यावा शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण

राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ सुलभ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *