मोदींच्या सत्तेबाबत शंका असल्यानेच मोहिते-पाटील, विखेंनी भाजप प्रवेश टाळला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

देशात मोदींची सत्ता येत नाही याची शंका आल्यावर विजयसिंह मोहिते पाटील व राधाकृष्ण विखेपाटील यांनी भाजपमध्ये जाणं टाळलं असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

आज अकलूज येथे मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर दिसले. परंतु त्यांनी भाजप प्रवेश केला नाही. तीच परिस्थिती नगरच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांची आहे. या दोन्ही नेत्यांना आपल्या जागा निवडून येतील का याबाबत विश्वास नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मोदींचं सरकार येत नाही म्हटल्यावर दोघांनीही आपली मुलं भाजपात पाठवली आणि स्वतः मात्र गेले नाहीत. दोघांनाही भाजप पुन्हा सत्तेत येईल का? याबाबत शंका असल्याने त्यांनी अशी भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *