राजकारण

मंदिरप्रश्नी आंदोलन करणारी भाजपा महिलांच्या लोकल प्रवासावर गप्प का ? रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर देण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. राज्य सरकार, महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता, असे असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस

रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …

Read More »

फडणवीस, दरेकरांचा दौरा पवारांच्या एका बालेकिल्ल्यातून सुरु होवून दुसऱ्यात संपणार दौऱ्याची सुरुवात बारामतीतून तर शेवट साताऱ्यात

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात …

Read More »

फडणवीस म्हणतायत, मुंबईत प्रादुर्भाव वाढतोय आणि चाचण्या कमी करताय मुंबईत २ टक्क्यांनी वाढले रूग्ण ,राज्यात प्रतिदिन चाचण्या ९२ हजाराहून ७५ हजारांवर

पाटणा: प्रतिनिधी कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करीत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील ९२ हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता ७५ हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे. मुंबईत सुद्धा संसर्गाचे प्रमाण हे २ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात आणखी एक पत्र माजी …

Read More »

ड्रग रँकेटमध्ये जे अडकले त्यांच्यावर कारवाई होणारच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले स्पष्ट

मुंबई : प्रतिनिधी “बॉलीवुडमधल्या काही जणांचा ड्रग रँकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवुड ड्रग रँकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवुडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल,” …

Read More »

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु मात्र हे व्यायाम बंद जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायाम शाळा प्रतिनिंधीशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त …

Read More »

अखेर मुख्यमंत्रीही निघाले अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यावर : असा राहणार कार्यक्रम मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारा १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय  विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारीने …

Read More »

यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे …

Read More »

कोरोना संकटकाळात ८५ हजार ४२८ बेरोजगारांना मिळाला रोजगार कौशल्य विकास व रोजगार मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक …

Read More »

देवेंद्र फडणवीस बारामतीतील शेतकऱ्यांना भेटून दौऱ्याची करणार सुरुवात सोमवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा …

Read More »