मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आज झाले. मात्र या निवडणूकीत राज्याच्या स्थानिक पातळीवरील जनतेचा कल दाखविणारी असून भाजपाच्या दोन आजी-माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या दोन नेत्यांना त्यांच्याच मुळ गावातच ग्रामपंचायतीतील पक्षाची सत्ता राखता आली नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेल्या खानापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा पराभव झालाय. हा पराभव …
Read More »पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना दिलासा: प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण …
Read More »विद्यापीठात “सामंतशाही” भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात “सामंतशाही” सुरु आहे. नँक मुल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पध्दतीने कुलसचिवांची नियुक्ती केल्याने त्याचा विद्यापीठाच्या मुल्यांकनावर परिणाम हाईल की काय? इथेही सरकारचा अहंकारच दिसून येतोय, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार …
Read More »उध्दव आपडा चे नंतर आता शिवसेनेचे “জয় বাংলা” ! (आनंद बांग्ला) शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी देशातील इतर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत उतरून प्रांतिक असलेल्या शिवसेनेने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली वाटचाल सुरु केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशपाठोपाठ आता शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. भाजपाला पर्याय ठरण्यासाठी शिवसेना पक्ष …
Read More »नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अन्यथा आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार
मुंबई : प्रतिनिधी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे खुलासा करताना आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्माशी आपले विवाहबाह्य संबंध असून त्यातून दोन मुले जन्माला आल्याची व त्यांना आपण आपले नाव दिल्याची जाहीर कबुली दिली आहे. हे ध्यानात घेता, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, …
Read More »… पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहतायत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप
नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतक-यांना उद्धवस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »लस वाटपातही केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्यायच लस साठा कमी आल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न देण्याचे काही थांबत नसून लस वाटपातही केंद्र सरकारकडून अन्याय झाला आहे. राज्यातल्या फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सना द्यावयाच्या लसीच्या निम्मा वाटाच केंद्राने पाठविला आहे. त्यामुळे राज्यातल्या फक्त ५ लाख वॉरियर्सना लस देणे शक्य होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्राला १७.५० लाख करोना …
Read More »५ वी ते ८ वीच्या शाळा या तारखेपासून होणार सुरु शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन -२०२५ शिक्षणाचा रोड मॅप तयार करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांची कोविडबाबत काळजी घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. …
Read More »ग्रामपंचायत निवडणूकीतील तब्बल २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी …
Read More »पवारांचे संकेत, कायदेशीर कटकटीतूनही मुंडेंना मिळणार दिलासा पवार म्हणाले, मुंडे-शर्मा प्रकरणाची स्वतंत्र चौकशी
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात आणखी तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा …
Read More »
Marathi e-Batmya