राजकारण

महसूल विभागाच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांमुळे अतिक्रमणधारकांना मिळणार भरपाई राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्यास महसूल आणि नगरविकास विभागाने विरोध दर्शविला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे नाकारलेला प्रस्ताव पुन्हा संमत करत केंद्र व राज्य सरकारच्या जमिनीवरील पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाला आज …

Read More »

भाजपला एकमार्गी विजय मिळणं हे मला पटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली परिस्थिती होती. कुणीही आमच्या सागंली जिल्हयाच्या सीमेवर पलिकडे जो भाग आहे. तिथलं लोकं काही काँग्रेस पक्ष आणि तिथल्या सरकारवर निगेटिव्ह बोलत नव्हते. एकंदरीत वातावरण बघितलं तर काँग्रेसला चांगलं वातावरण होतं. त्यामुळे काँग्रेसचा विजय होईल असं वाटत होतं. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसादही मिळत …

Read More »

बँलेट पेपरवर निवडणूका घ्या आणि संशय दूर करा कर्नाटकच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपरोधिक टीका करत मागणी

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक निवडणूकीत लागणारे निकाल हे वेगवेगळे असतात. त्यानुसार कर्नाटक विधानसभेचा निकाल लागलेला आहे. एकाबाजूला देशातील पोटनिवडणूकांमध्ये भाजपचा पराभव होत आहे. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिन्सबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे भाजपने एकदा बँलेट पेपरवर निवडणूका घेवून लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी उपरोधिक मागणी शिवसेना …

Read More »

विधान परिषद निवडणूक प्रक्रियेस आयोगाकडून स्थगिती निवडणूक आयोगाकडून आचार संहिता मागे

मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने दि. १४ मे २०१८ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या ‍द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरिता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले …

Read More »

पाकिस्तानातून दाऊदला आणण्याचे आश्वासन देणा-या मोदींनी दाऊदऐवजी साखर आणली देशातल्यापेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता असल्याची खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात केली. यामुळे साखरेचे दर कोसळणार असून याचा फटका साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे आश्वासन देणा-या …

Read More »

ऊस उत्पादक शेतकरी मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तानच्या साखरेचे स्वागत या देशात व्हायला लागले तर या देशातील ऊस उत्पादक शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाकिस्तान साखर खरेदीवर केंद्र सरकारला दिला आहे. आज पाकिस्तानची साखर देशात यायला लागली. म्हणजे आपण पाकिस्तानची …

Read More »

पलुसमध्ये भाजपची माघार मात्र पालघर मध्ये शिवसेनेचा नकार भाजपची राजकिय कोंडी

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. या निवडणूकीत काँग्रेसकडून कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा शिवसेनेने पाठिंबा देत उमेदवार न देण्याचे जाहीर करत पाठिंबा दिला. मात्र भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून ४६ महिन्यात जाहीरातबाजीवर ४ हजार कोटींची उधळपट्टी चोहोबाजूंच्या टिकेनंतर चालू वर्षाच्या खर्चात २५ टक्यांची कपात

मुंबई : प्रतिनिधी देशाच्या सर्वोच्च पदी अर्थात पंतप्रधान पदी विराजमान होण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारकडून जाहीरातबाजीवर करण्यात येत असलेल्या खर्चावर प्रश्न विचारले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ४६ महिन्याच्या कारकिर्दीत सरकार आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर ४ …

Read More »

राजकीय हित साधण्यासाठीच सरकारकडून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

औरंगाबाद : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव आणि औरंगाबाद येथील घटना पा‍हता सामाजिक अशांतता निर्माण करुन राजकीय हित साधण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न दिसतो. स्‍थानिक पातळीवर सत्‍ताधारी पक्षाचे खासदारही प्रक्षोभक वक्‍तव्‍य करुन सामाजिक तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतात, त्‍यांच्‍यावर सरकार कारवाई करणार का? असा सवाल करुन औरंगाबाद येथील घटनेत गृहखाते पूर्णतः अपयशी ठरले असल्‍याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी …

Read More »

औरंगाबादच्या हिंसाचारास मुख्यमंत्र्यांचे गृहखाते जबाबदार विधानसभा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे मोठे अपयश असून, पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळेच शहराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्नाला गृह खातेच जबाबदार असल्याचा आरोप करून या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. औरंगाबादच्या हिंसाचारासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »