राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या सायबर फसवणूक तक्रारीसाठी 'गोल्डन अवर' महत्वाचा

रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ‘ गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही ‘गोल्डन अवर’ महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्याल, तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी, …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात कार्यशाळा हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन राऊत यांचेही मार्गदर्शन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण, या विषयावर प्रांताध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

अतुल सावे यांची माहिती, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत दूध उत्पादन शेतकरी खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना

राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मिठी नदीच्या निविदा प्रक्रियेत सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन तीन वर्षे मनपाचा हेतू वाईट होता का? मनपाचे स्पष्टीकरण म्हणजे घोळ असल्याची मान्यता

मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांवर मुंबई महानगरपालिकेने माध्यमांना दिलेले स्पष्टीकरण हे या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची मान्यता असून या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा पलटवार, कधी छदाम तरी दिला का, आम्ही देणेकरी आहोत विचार बाळासाहेबांचे आणि स्तुती भाजपाच्या मोदी यांची

शिवसेना उबाठाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार म्हंटल्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे दसरा मेळावा घेणार अशी चर्चा सुरु झाली. आधी शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा वरळीच्या डोममध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नंतर ऐनवेळी हा दसरा मेळावा गोरेगांव मधील नेस्कोच्या मोठ्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. त्यामुळे शिंदे यांचे …

Read More »

भरपावसात उद्धव ठाकरे यांची टीका, वाघाचं कातडं पाघंरणाऱ्या गाढवाची गोष्ट माहित आहे का ? अमित शाहचे जोडे त्यांनाच लखलाभ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपावर टीका

शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. परंतु संध्याकाळपासून अचानकच कधी पाऊस तर कधी ऊन असे निसर्गाचे चित्र पाह्यला मिळत. त्यातच पाऊस सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते मंचावर उपस्थित होते. या भरपावसातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तमाम शिवसैनिकांना दसऱ्याच्या सुरुवात केली. उद्धव ठाकरे …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या बीडच्या नारायण गडावरून पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांची मागणीही आणि इशारा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे. मनोज जरांगे …

Read More »

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार.. शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती …

Read More »

दारूची दुकाने परमिटबार आदी सोडून सर्व दुकाने २४ तास खुली राहणार राज्य सरकारकडून नवा शासन निर्णय जारी

तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्णयानुसार मुंबईतील नाईट लाईफ सुरू ठेवण्यासाठी नव्या कायद्याची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी नव्या नियमानुसार २४ तास दुकाने खुली ठेवण्याची तरतूदही करण्यात आली होती. मात्र राज्यातील सरकार बदलले आणि हा नियम नव्या महायुतीच्या सरकारने कचऱ्याच्या डब्यात टाकला गेला. परंतु आता …

Read More »

सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

सणासुदीच्या काळात  अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन  विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ‘सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १ हजार ५९४ अन्न पेढ्यांची तपासणी करण्यात आली असून २ हजार ३६९ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी …

Read More »