राजकारण

शिवसेना उबाठा आक्रमकः मुंबईत मराठी बोललीच पाहिजे आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्या त्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक बोली भाषा बोलल्या जातात. मात्र मुंबईत रहायचे तर मराठी भाषा आलीच पाहिजे असा कायदा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना करण्यात आला होता. मात्र आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नुकतेच मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही असे …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः विद्यार्थ्यांचा ५०० रुपयांचा भुर्दंड वाचला ५०० रुपयांची स्टॅम्प ड्यूटी रद्द- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

राज्यातील १० वी, १२वी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविधप्रकारच्या कागदपत्रांसाठी भरून द्यावे लागणाऱ्या ५०० रूपयांचे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे लागत होते. मात्र आता यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांना कोणत्याही लागणाऱ्या कागदपत्रांसाठी ५०० रूपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याची गरज राहणार नाही. केवळ स्वःहस्ताक्षरात साध्या कागदावर …

Read More »

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सदस्यांच्या ठरावावर सह्या

निष्ठावान म्हणून शिवसेना उबाठा पक्षात ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मागील काही काळात वादग्रस्त विधाने केली आहेत. तसेच उपसभापती पदावर कायम राहता यावे यासाठी शिवसेना उबाठा पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची आमदारकी धोक्यात आली. मात्र त्यांच्या अपात्रतेसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,….हे धाडस कुठून येते? गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

भोकरदनमधील पिडीत कैलास बोराडें प्रकरणी एकनाथ शिंदे यांचे निवेदन पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य शासन करेल

जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई  केली जाईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्यशासन करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत सांगितले. भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरदेसाई वाडा ताब्यात घेणार संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यात उभारणार स्मारक

संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात  येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेमध्ये सांगितले. सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज …

Read More »

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी अखेर विधानसभेतून निलंबित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी हे निलंबन कायम राहणार

मुघल शासक औरंगजेबाच्या उद्दातीकरण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना सध्या सुरू असेलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी विधानसभा सदस्यत्व निलंबित केले. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च रोजी संपेल. दोन दिवसांपूर्वी आझमी यांनी औरंगजेबाचे वर्णन एक उत्कृष्ट प्रशासक असे केले होते; या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण …

Read More »

नाना पटोले यांचे आव्हान, … कोरटकर व सोलापूरकरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा भाजपाच्या मूळ विचारसरणीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान

भाजपाच्या विचाराचे जे मुळ आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा सातत्याने अपमानच केला आहे. हा प्रकार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहूल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा …

Read More »

राज्यात कामगारांसाठी ‘नाका शेड’ ची उभारणी करणार कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विधानसभेत माहिती

राज्यात मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमध्ये नाक्यांवर कामगार मोठ्या प्रमाणावर असतात. नाक्यावर थांबून आपल्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी शेडची आवश्यकता असते. अशा ठिकाणी जागेची उपलब्धता तपासून नाका शेडची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य सत्यजित देशमुख यांच्या प्रश्नाला कामगार …

Read More »

वाघ-बिबट्यांचे हल्ले, गावांना साळखी कुंपण घालण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी साखळी कुंपनासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

भंडारालगत कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोन जवळील गावात महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. यामुळे जनतेत रोष आहे. या प्रकरणी लोकांनी वन विभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. बिबट्याच्या हल्ल्यात देखील लोकांची जीवित हानी होत आहे. त्यामुळे वाघ आणि बिबटे ज्या गावाच्या आसपास येतात त्या गावांना साखळी कुंपण घालावे अशी मागणी …

Read More »