राजकारण

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाहीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना …

Read More »

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा कार्यक्रम

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार …

Read More »

१२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊंचे साहित्य लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभ अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध असून त्यांचा वाटेगाव ते मॉस्को प्रवास आहे. तो उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्यातून समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडले आहे. त्यांचे साहित्य वीस पेक्षा अधिक भाषेत अनुवादित झाले असून त्यांचे साहित्य जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अण्णा भाऊ …

Read More »

त्या टीकेवरून गाडी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला जितेंद्र आव्हाड यांची टीका, संभाजीराजे छत्रपती रक्ताचे वंशज, मी विचारांचा वंशज

विशाळगडावर अतिक्रमाणाच्या नावाखाली संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पायथ्य़ाशी रहात असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या दुकानावर आणि मस्जिदीची नासधुस करण्याचा प्रयत्न केला. त्य़ावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच संभाजी राजे यांचे वडील खासदार छत्रपती शाहु महाराज आणि काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांनी भेट घेत नागरिकांना दिलासा. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, आरक्षणाचे वर्गीकरण हे कलम १४ चे उल्लंघन तर समानतेच्या तत्वाचेही उल्लंघन होईल

आरक्षणाचे लाभार्थी हे केवळ अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी SC, ST आणि OBC नसून, जनरल कोट्यातील लोकही आहेत. जर फक्त अनुसूचित जाती SC श्रेणी (ऐतिहासिकदृष्ट्या वंचित) वर्गीकृत केली गेली असेल, तर ते समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करते आणि घटनेच्या कलम १४ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला न्याय देत नाही असा दावा वंचित बहुजन आघाडीचे …

Read More »

डॉ तानाजी सावंत यांचे आदेश, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करा रुग्ण रेफर प्रकरणांची समितीमार्फत पडताळणी करावी

यावर्षी पावसाचे वितरण असमान दिसून येत आहे. काही भागात कमी कालावधीत मोठा पाऊस होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भातील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूर परिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क असावे. त्यासाठी शहर, गावांमध्ये स्वच्छतेसह डास निर्मूलन मोहीम राबवावी. पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध …

Read More »

शाब्बास स्वप्नील…ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटींचे पारितोषिक जाहीर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी साधला पॅरिसमधील स्वप्नीलशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष …

Read More »

… तोपर्यंत टोल वसुली थांबवा; अजित पवार यांचे आदेश महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा

महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक …

Read More »

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल स्पर्धेत स्वप्निल कुसाळेने जिंकले पदक नेमबाजीत भारताला आणखी एक पदक

१ ऑगस्ट रोजी, भारतीय खेळाडू ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आणि बॉक्सिंग यासारख्या विविध खेळात स्पर्धेत आपला वरचष्मा राखण्यात सातत्य राखले. दरम्यान, ५० मीटर रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांनी पुरुष एकेरी स्पर्धेत ब्रॉझ पदक जिंकले. एच.एस. प्रणॉयने आणि लक्ष्य सेनने पुरूष एकेरी स्पर्धेच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील १६ व्या फेरीत प्रवेश केला असून …

Read More »