राजकारण

अजित पवार यांचे निर्देश, आदिवासी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा आदिवासी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान द्या...

राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा. वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थात्मक पिककर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील ९६९८ आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा. आदिवासींच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, सरकारचे खोके, जनतेला धोके’ असं मिंधेंच धोरण नोव्हेंबरमधे आमचं सरकार येणार, रस्ते घोटाळ्यातील भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आणि मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागणार

खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक आणि मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झालीआहे . चाकरमानी कोकणात आता गणपतीला जातील. गडकरी यांना आवाहन आहे, त्यांनी एकदा एकदा गाडीने जावं. मग कळेल किती काम झालय. कारण मुंबई असो वा ठाणे रस्त्यावरचे खड्डे मोजावे की खड्ड्यात रस्ते शोधावे अशी स्थिती निर्माण झाली आहे अशी …

Read More »

दिल्ली कोचिंग पूर प्रकरणी आणखी ५ जणांना अटक १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यूप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाचही आरोपींना सोमवारी तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये मालमत्तेचे चार सह-मालक होते. यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी जुन्या राजिंदर नगरमधील कोचिंग सेंटरच्या पूरग्रस्त तळघरात बुडून तीन नागरी सेवा इच्छुकांच्या …

Read More »

परतवारीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात २० हजार रुपये जमा आषाढ वारीतील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटींचे वितरण

आषाढ वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी २०००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. परतवारीपूर्वीच याची पूर्तता …

Read More »

मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांच्या त्या आरोपावर म्हणाले, माझ्यासाठी धक्कादायक पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर

राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि इतर नेत्यांमध्ये आता चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे मनोज जरांगेच्या भूमिकेवरून रोज एका नेत्याकडून विविध पातळीवर भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस असा सामना रंगविण्यात येत असल्याचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, दिव्यांगाना आता अडीच लाख कर्ज देणार दिव्यांगांसाठी सर्व महानगरपालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करा

दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महानगरपालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, भाजपाचे चक्रव्युह तोडू, जातीय जनगणनेचा निर्णय जाहिर करू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निर्माण केलेल्या चक्रव्युववर अदानी-अंबानीचे नियंत्रण

देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी झालेल्या हलवा पार्टीला फक्त २० अधिकारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अदानी अंबानीचे प्रतिनिधी उपस्थित होते असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत देशातील ९८ टक्के जनतेपैकी कोणीही या हलवा पार्टीला उपस्थित नव्हते असे सांगत यापैकी २ टक्के …

Read More »

नाना पटोले यांचे आव्हान, पुरावे आहेत तर कारवाई करा फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे. फडणवीस हे ७.५ वर्ष गृहमंत्री पदावर आहेत, त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे काही व्हीडीओ व ऑडिओ क्लिप्स आहेत असा …

Read More »

पर्यटन विभागाचे आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभागाच्या अधिनस्त असल्या तरी त्यांचे बोधचिन्ह, घोषवाक्य यामध्ये तफावत होती, ती आता दूर करण्यात आली आहे. आता ‘महाराष्ट्र टुरिझम’ हे बोधचिन्ह (लोगो), ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे घोषवाक्य (टॅग लाईन) असेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी …

Read More »