राजकारण

सचिन सावंत यांचा टोला, केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली ? अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीला सीबीआयला ५ वर्षे लागली; पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार?

भाजपा सरकारने सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत व पालघर साधू प्रकरणात मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी करण्यास सीबीआयला ५ वर्षे लागली आता पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करून पालघर साधूंची केस …

Read More »

अमित शाह यांची ग्वाही, नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज ‘इंडिया मेरीटाईम वीक - २०२५’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली टीका राजधर्माला शोभत नाही फलटणची घटना राजकारणाचा विषय नाही तर महिला सुरक्षेची म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नको आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील

कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या वारीदरम्यान आळंदीत लाखो वारकरी येतात. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्या दर्जेदार असतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.आळंदीतील भक्तनिवास, घाट विकास कामांचे भूमिपूजन आणि रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत ‘मेगा प्रोजेक्ट’ देऊ १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध …

Read More »

महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी मुख्यमंत्री फ़डणवीस यांची माजी खा निंबाळकरांना क्लिन चिट विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा नामोल्लेख करत आरोप केले होते. मृत तरूणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात साताऱ्यातील खासदार असा उल्लेख असल्याचे दानवे आणि इतर विरोधकांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यादा भाष्य करत म्हणाले …

Read More »

आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश, भूखंड सुपुर्द वित्तमंत्री अजित पवार यांचे उर्दू घरासाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन

भिवंडीमध्ये लवकरच शानदार ‘उर्दू घर’ उभे राहणार आहे. या प्रस्तावित उर्दू घरासाठी आवश्यक २५०० चाै. मी. भूखंड ठाणे जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे नुकताच सुपूर्त केला. भिवंडीत उर्दू घर उभे राहावे, यासाठी ‘भिवंडी पूर्व’चे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख सातत्याने पाठपुरावा करत होते. आमदार शेख यांच्या पाच वर्षाच्या पाठपुराव्याला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादुर' यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त दादर येथील योगी सभागृहात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

शीख पंथाचे ९ वे गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य हे केवळ शीख पंथीयांसाठी नव्हे, तर संपूर्ण भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गुरु तेग बहादुर यांच्या हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर पोहोचविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘हिंद दी चादर श्री गुरु …

Read More »

आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला खासदाराने फोन करून दबाव आणला एका आरोपीचा खोटा वैद्यकीय अहवाल देण्यासाठी दबाव, भदानेची तक्रार करूनही दुर्लक्ष

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आत्महत्या करून मृत्युमुखी पडलेल्या आणि एका पोलिस अधिकाऱ्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या महिला डॉक्टरवर केवळ पोलिसांकडूनच नव्हे तर एका खासदारानेही वैद्यकीय अहवाल खोटे करण्यासाठी दबाव आणला होता. डॉक्टरच्या एका नातेवाईकाने यापूर्वी असा दावा केला होता की, अनैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणांमध्ये पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी आणि अटक केलेल्या व्यक्तींना …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देत, संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट

एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »