राजकारण

अखेर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब अर्ज भरण्यास अवघा एक तासाचा अवधी शिल्लक राहिल्यानंतर अंबादान दानवे यांनी भरला उमेदवारी अर्ज

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. मात्र महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तसेच त्यांनी स्वतः ऐवजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे काँग्रेसकडून याबाबत …

Read More »

विधान परिषदेची आमदारकी- बच्चू कडू थेट शिंदे शिवसेनेत दाखल प्रहार संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व, विधान परिषदेसाठी बच्चू कडू, नीलम गोऱ्हे यांना संधी

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनीही विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्याच्या काही वेळ आधी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू …

Read More »

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीमध्ये १२ वर्षानंतर भरीव वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी पाठबळ मिळेल अशारितीने शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. १२ वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये पहिल्यांदाच भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उच्च माध्यमिक परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना’ या …

Read More »

महाराष्ट्रात हरित ऊर्जेसाठी १२ हजार ३०३० कोटींची मॅजेस्टिक योजना २०३० पर्यंत अक्षय उर्जेचा स्रोत ५० टक्क्यांवर पोहचणार

राज्यातील हरित ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढविणे, पारेषण प्रणाली अधिक सक्षम करणे आणि ऊर्जा साठवण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र : ॲक्सलीरेटिंग ग्रीन एनर्जी अँड स्टोरेज टेक्नॉलीस इंटिग्रेशन इन कनेक्टेट ग्रीड (एमएजीईएसटीआयसी) या महत्त्वाकांक्षी योजनेस तसेच तिच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या …

Read More »

राज्यात २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवड होणार हरित महाराष्ट्र आयोग करणार नियोजन व अंमलबजावणी

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्याने २०४७ पर्यंत ३०० कोटी झाड़े लावण्य़ाचे उद्दिष्ट्य ठेवले असून, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयोगावर सोपविण्यात आली आहे. आयोगाच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री असतील, तर उपमुख्यमंत्री …

Read More »

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टरेट करणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. भारतरत्न डॉ. …

Read More »

महाराष्ट्र एआय धोरण २०२६ जाहीर; दहा हजार कोटींची गुंतवणूक, दीड लाख रोजगार संधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली धोरणाला मंजूरी

राज्यातील उद्योग, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यापक वापर वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र एआय धोरण-२०२६’ जाहीर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या या धोरणाच्या माध्यमातून संशोधन, नवोपक्रम आणि जबाबदार प्रशासन यांना चालना देण्यात येणार आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ७० …

Read More »

रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, भाजपाची लोकाभिमुख कार्यशैली जनतेपर्यंत पोहोचवा प्रवक्ता कार्यशाळेत बोलताना केले मार्गदर्शन

भाजपा परिवाराच्या विचारधारेचा प्रभावी प्रसार तसेच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्यशैली जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील प्रदेश प्रवक्ता आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुख यांच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एनटीपीसी’शी सुधारित सामंजस्य करार दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार

एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि ‘एनटीपीसी’ यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा …

Read More »

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, वाळू धोरण २०२५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथके, कोकण विभागासाठी विशेष तरतुदी

राज्यातील वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध वाळू उपशावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यानुसार ८ एप्रिल २०२५ च्या वाळू धोरणात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या सुधारणांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आता भरारी पथकांचे काटेकोर लक्ष राहणार असून काही नियमही …

Read More »