काका पुतण्यात संघर्ष: शरद पवार गटाने ४० आमदारांना…. अजित पवार गटाचे दावे फेटाळले -निवडणूक आयोगाला पाठविले ई-मेलद्वारे पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.यावर शरद पवार गटाने अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार गटाने केली असून काका पुतण्यामध्ये संघर्ष वाढलेला दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै रोजी फूट पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली होती. मात्र अजित पवार गटाने अजित पवार गटाकडून अजित पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा केला होता तसे निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते. यासंदर्भात शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर देण्यात आले असून यामध्ये अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. तर अजित पवार यांच्या सोबत मंत्री झालेले ९ आणि त्यांच्या सोबत गेलेल्या ३१ अशा ४० आमदारांना अपात्र करा अशी मागणी शरद पवार गटाने केली निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शरद पवार गटाने निवडणूक आयोगात केलेल्या याचिकेची दखल घेतल्यानंतर आयोगाने अजित पवार गटाला नोटीस पाठवली होती. राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार ८ आमदारांना घेऊन राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. दोन जुलै रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे पक्षातल्या काही लोकांनी वेगळा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, अजित पवारांसह नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आलं होतं. तर, निवडणूक आयोगाने आधी शरद पवार गटाची सुनावणी घ्यावी, असं कॅव्हेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केले होतं.

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले. त्यामध्ये अजित पवार गटाने केलेले दावे शरद पवार गटानं फेटाळले आहे. शरद पवार गटाकडून ऑनलाईन पद्धतीनं उत्तर देण्यात आले. शरद पवार गटाने केलेल्या याचिकेची दखल घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला नोटीस पाठवली होती.तर अजित पवार गटाकडून सुद्धा आयोगाकडे उत्तर दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरी प्रकरण आणि त्यानंतर लागलेला निकालाचा दाखला अजित पवार गटाकडून देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारच असल्याचा दावा उत्तरात करण्यात आला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *