राजकारण

बाळासाहेब थोरात म्हणाले, राणाने रंग दाखविण्यास सुरुवात केलीय ‘हनुमान चालीसा’ राजकीय मुद्दा बनवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न -बाळासाहेब थोरात

निवडणूकीच्या काळात महाविकास आघाडीने राणा दांम्पत्याला पाठिंबा दिला. मात्र निवडणूकीच्या विजयानंतर राणा दांम्पत्याने आपले रंग दाखविण्यास सुरवात केल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांचे नाव न घेता करत ती आघाडीची चूक होती असेही ते म्हणाले. केंद्रातील भाजपाचे सरकार …

Read More »

संजय राऊतांचा इशारा, शिवसेनेच्या नादाला लागाल तर, गौऱ्या रचून या २० फुट खड्यातही जाल असा राणा दांम्प्त्याला इशारा

मातोश्रीसमोर आम्ही हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान शिवसेनेला देत मुंबईत आलेल्या राणा दांम्पत्याला अखेर शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे आपले आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करावी लागली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राणा दांम्पत्यावर चांगलीच टीका केली असून शिवसेनेच्या नादाल लागाल तर आधी गौऱ्या रचून या असा गर्भित इशारा देत २० …

Read More »

राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली असून भारतीय जनता पार्टी त्याबद्दल चिंता व्यक्त करते तसेच निषेध करते, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या …

Read More »

दिड दिवसांच्या अखेर नाट्यानंतर राणा दांमप्त्यांकडून आंदोलन स्थगित पंतप्रधानांच्या दौऱ्याचे कारण पुढे करत अखेर केली घोषणा

मागील दिड दिवसांपासून मातोश्रीच्या समोर जावून हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना शिवसेनेच्या विरोधात आठमुठी भूमिका घेतली होती. मात्र शिवसैनिकांनी मातोश्रीबरोबरच राणा दांम्पत्याच्या खार येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे अखेर राणा दांम्पत्यांनी घराबाहेर पडण्यापेक्षा घरातूनच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई …

Read More »

‘टक्केवारी ‘ च्या हव्यासापोटी राज्यात विजेची कृत्रीम टंचाई ठाकरे सरकारकडून ग्राहकांची लुट ; भाजपाचे ज्येष्ठ नेते आ . आशीष शेलार यांचा आरोप

‘टक्केवारी’च्या हव्यासापोटी खुल्या बाजारातून चढ्या दराने वीज खरेदी करण्यासाठीच राज्यात आघाडी सरकारकडून विजेची कृत्रीम टंचाई निर्माण केली जात असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आशीष शेलार यांनी शुक्रवारी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात भाजपा राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कमाल …

Read More »

ऊर्जा मंत्री राऊतांची घोषणा, सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास सहा हप्त्यांची सोय महावितरणकडून वीजग्राहकांना दिलासा; अधिकची सुरक्षा ठेव समायोजित करणार

वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांचा सरासरी वीजवापर कमी झाला असल्यास सुरक्षा ठेवीमधील जादा रक्कम देखील त्यांच्या वीजबिलामध्ये समायोजित करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा …

Read More »

अखेर वीज कंपन्यांना “ती” गोळी लागू पडलीः अतिरिक्त वीज मिळणार वाढत्या तापमानात ग्राहकांना दिलासा

कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या वीज टंचाईमुळे राज्यात लोडशेडींगचे संकट निर्माण झालेले असताना खाजगी वीज कंपन्यांनी महावितरणला वीज पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याने वीजेचे मोठे संकट उभे ठाकले होते. मात्र करारानुसार वीज उपलब्ध न करून देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि वीज मंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांना …

Read More »

संजय राऊत म्हणाले, बंटी आणि बबलीसाठी पोलिस आणि शिवसैनिक समर्थ राणा दांमप्त्याच्या आव्हानावर राऊतांची टीका

मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा करत राणा दांम्पत्याने आज मुंबईत पाऊल ठेवले. मात्र हनुमान चालिसा उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री बंगल्याच्यासमोर जावून म्हणणार असल्याचे जाहीर केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते म्हणाले, …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत …

Read More »

‘हनुमान चालीसा’ म्हणण्याऐवजी ‘विकासाची संजीवनी’ लोकांपर्यंत पोचवा सरकार अस्थिर करण्यासाठी कितीही प्रयत्न करा... उलट भक्कम आहे-महेश तपासे

राज्यातील व देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं नाही… तर दुसरीकडे जातीय तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र हे सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला. भाजपा पुरस्कृत खासदार नवनीत …

Read More »