राजकारण

संभाजी राजेंनी केले भुजबळांचे कौतुक, हेच शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनंतर खासदार संभाजी राजेंचे वक्तव्य

छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून ओबीसींचे नेतृत्व करत आहेत. त्याबद्दल मला आनंद आहे. भुजबळ हे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार घेऊन समतेचा लढा लढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू आहे. मी नुसता वंशज छत्रपती घराण्याचा वशंज आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू …

Read More »

फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना “तो” शब्द माहित आहे पण मी वापरणार नाही महाविकास आघाडी सरकारने वेश्यांच्या पैशातही डल्ला मारला

या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित …

Read More »

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राज ठाकरेंना विनंती

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. आज राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी वरील विनंती केली. महाराष्ट्र शांत आहे… कुठेही क्लेश नाही… द्वेष दिसत नाही… सर्व …

Read More »

गडकरी-राज भेटीनंतरही रावसाहेब दानवे म्हणतात, हे शक्य नाही भाजपा-मनसे युतीची शक्यता लावली फेटाळून

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाच्या प्रचाराच्या मुद्यांवर आधारीत भाषण करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. त्याचे पडसाद काल रविवारी मोठ्या प्रमाणावर उमटल्यानंतर रात्रो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले तसेच या दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, आता ईडी काय हजार पाचशे रूपयांची चौकशी करणार का? कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजपा ईडीच्या आश्रयाला

भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातील मतदारांनाच दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना या १७ पध्दतीच्या चाचण्या मोफतः वाचा यादी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ५ हजार रूपयापर्यंतच्या चाचण्या मोफत

मागील आठवड्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य हिताच्यादृष्टीने वयाची ४० ओलांडलेल्या आणि ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य चाचणी मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यावर शिक्का मोर्तब करण्यात आला. या निर्णयानुसार ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी आरोग्य चाचणी …

Read More »

अजित पवारांचा इशारा, जर १० रूपये दिले नाही तर पुढच्या वर्षी… साखर कारखान्यांना दिला इशारा

जर कोणत्या साखर कारखान्याने ऊसतोड कामगारांच्या निधीसाठी टनामागे १० रुपये दिले नाही, तर पुढच्या वर्षी त्याच्या कारखान्याला ऊस जाणार नाही, असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखान्यांना दिला. तसेच सरळ देत नसतील तर बोट वाकड करावं लागतं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. ऊसतोड कामगारांच्या जीवावर मोठे होता आणि त्यांच्यांसाठी …

Read More »

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्वाही

ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या  दुरदृष्यप्रणालीद्वारे  उदघाटन प्रसंगी  ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक …

Read More »

मंत्री यशोमती ठाकूर यांचा सवाल, “राज ठाकरे, खरे प्रश्न विसरलात का?” भोंग्यावरून काँग्रेस मंत्र्यांनी केली खोचक टीका

मशिदीवरील भोंगे उतरविण्यातबाबत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला असला, तरी यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. धार्मिक विष अधिक वेगाने पसरवले जाऊ शकते. राज ठाकरे यांची वाटचाल आता भाजपची बी टीम म्हणून होते आहे का? हा खरा प्रश्न आहे. कारण देशाला खरा धोका राज ठाकरेंच्या मागे ईडी लावणाऱ्यांपासून आहे. …

Read More »

राज ठाकरेंच्या आदेशाबर भोंगा लावणाऱ्या मनसैनिकाला पोलिसांनी दंड ठोठावत दिली नोटीस पाच हजाराचा दंड आणि परत लावल्यास अटकेची नोटीस बजावली

मस्जिदींवरील भोंगे काढण्याची भाजपाची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरत ज्या मस्जिदीवर मोठे भोंगे काढणार नाहीत त्या मस्जिदसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालिसा लावा असे आदेश काल मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात मनसैनिकांना दिल्यानंतर मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसैनिक असलेल्या महेंद्र भानुशाली यांनी चिरागनगर येथील मनसे कार्यालया बाहेर भोंगे लावले. यानंतर …

Read More »