उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सुनेत्रा अजित पवार यांनी आज स्वीकारला अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना भावूक...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्या अगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक झाल्या.

सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दादांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, युवा नेते पार्थ पवार,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार सना मलिक शेख, आमदार सतिश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी,आमदार विक्रम काळे, आमदार शेखर निकम, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार आशुतोष काळे,आमदार हिरामण खोसकर, आमदार पंकज भुजबळ,माजी आमदार झिशान सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,आदींसह सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *