शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी नागपूरात प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वर्तमान पत्रांनी वृत्त दिले. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने आंदोलनाची दखल घेत आंदोलकांना हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. पोलिसांनीही न्यायालयाची प्रत घेऊन आंदोलकांना हटविण्यासाठी गेले, मात्र आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका पाहता पोलिस यंत्रणेने कोणतीही कारवाई न करताच परत फिरले.
त्यानंतरही न्यायालयाच्या निकालावर बच्चू कडू यांनी एक दिवस शेतकरी रस्त्यार उतरून शहरी भागातील नागरिकांना त्रास दिला तर न्यायालयाला दखल द्यावीशी वाटली. पण जेव्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यानंतर आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची दखल न्यायालयाने घेतली असती तर बरे झाले असते असे सांगत, न्यायालयाने त्यावेळी दखल घेतली नाही. मात्र आताच्या आंदोलनाच्या वृत्ताची दखल घेतली. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रस्ते मोकळे करून देतो, शेतकऱ्यांबद्दल बोललो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करा आणि रस्ते मोकळे करा अशी मागणी करत आम्हाला तुरुंगात बसून आंदोलन करण्याची व्यवस्था करू असेही यावेळी सांगितले.
त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर तसाच ठिय्या देत आंदोलन पुढे सुरु ठेवले. आता बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवंत हक्कांसाठी, जगण्याचे व जिवंत राहण्याचे प्रश्न घेऊन अन्न निर्माता शेतकरी ऱस्त्यावर उतरला. तर त्यांनी रस्ता अडवला असे म्हणत न्यायालयाच्या सुट्टीकालिन वृत्तपत्रे वाटून गंभीर दखल घेतली याबाबत न्यायालयाचे आभार असेही यावेळी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सह २२ विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही होते. नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले. त्यामुळे नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.
आज सकाळी काही आंदोलक रेल्वे रूळांवर उतरले आणि रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी मार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, सरकारने राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. काही आंदोलकांनी आसपासच्या शेतात मोकळ्या जागेत तसेच एनएचएआयतर्फे विकसित केलेल्या ऑक्सीजन-बर्ड पार्कमध्ये प्रवेश करून तेथे ठिय्या दिला. काही शेतकरी विश्रांती घेत असताना इंतरांनी मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली असल्याचे सांगितले.
दरम्यान, बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलन सुरु ठेवत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya