उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही… भाजपा आणि मनसेवर टीका

विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले. इतकेच नव्हे तर माहिममधून त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्यांदाच उमेदवारी दिली. परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यातच भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तरी विजयाचा उत्सव साजरा केला जात नसल्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मनसे वर टीका केली. मनसेच्या घाटकोपर येथील काही कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मनसेवर टीका केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जणांनी राजकिय पक्षाची स्थापना केली. मात्र पक्ष स्थापन करताना काही व्हिजन आणि विचार असावा लागतो. मात्र मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही असे नाही असे सांगत आपल्या हक्काची मुंबई आपल्यापासून लचके तोडून नेले जात आहेत. मात्र आपण षंढासारखे फक्त बघत राहतो अशी खोचक टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वास्तविक पाहता एकाद्याचा पराभव झाला तर त्याच्याकडे कोणी जात नाही. विजयी झाल्यानंतर तर सगळेच येतात. परंतु तुम्ही माझ्याकडे आलात. ज्यांना विधानसभा निवडणूकीत विजय मिळविला. त्यांनाही मिळालेल्या विजयावर विश्वास बसत नाही. त्यांच्या विजयाचा जल्लोष कुठेच नाही. या विजयात ईव्हीएमचा घोटाळा असेल आणि अन्य काही घोटाळे असतील मात्र त्या घोटाळ्यामुळेच त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा उत्सव किंवा विजय साजरा केला गेला नसल्याची टीकाही यावेळी भाजपाचे नाव न घेता केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात चोर-दरोडेखोरांचं राज्य आलं आहे. त्यामुळे तुमच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभा असेन असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाचे नाव न घेता संपूर्ण मुंबई बरबटून टाकली म्हणत आहेत एक है तो सेफ है. आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे, उद्याची मुंबई आपली राहणार आहे का असा सवाल उपस्थित करत कारण असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यादेखत ओरबाडून नेली जात आहे. तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला बोलायचे नाही. पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काही तरी हेतू लागतो, दिशा लागते. ती त्या पक्षात अजिबातच नाही. अशा वेळी तुमच्या सारखे कार्यकर्त्ये तिथे मरमर मेहनत करतात. त्या मेहनतीला काही अर्थ नाही. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात असे सांगत त्यांचे स्वागत केले.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जेव्हा फिरत होतो सगळे म्हणत होते की, लोकांच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच आहात. तुम्हीच येणार. मला गंमत वाटते की जे काही सर्व्हे चालले होते, त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण होता, मीच होतो. मग दांडी कशी उडाली असा सवाल उपस्थित करत कारण हे सगळं राज्य चोर आणि दरोडेखोरांचं राज्य आहे. हे राज्य आता उलथवून आपल्याला टाकावं लागेल असे सांगत एक ठिणगी तर आता पडली आहे. मागच्या रविवारी मी बाबा आढाव यांना भेटून आलो. आता तुम्हाला झोपून चालणार नाही. मुंबईच्या मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. योग्य वेळी मशाल हाती घेत्याचे सांगत शिवसेनेचा भगवा हाती घेतला असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार

राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *