वंचित बहुजन आघाडीकडून आणखी उमेदवारांची ४ थी यादी जाहिर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघातील उमेदवारांची यादी

लोकसभा निवडणूकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीची युती करण्याच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुर होत्या. मात्र महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चा यशस्वी न झाल्याने मागील निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी एकला चलो रे म्हणत आपले उमेदवार उभे करत सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीतही वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे चा नारा देत आदीवासी, मुस्लिम मतांची गणिते नजरेसमोर ठेवत आपली उमेदवार जाहिर केले. आज वंचित बहुजन आघाडीने आज उमेदवारांची चवथी यादी जाहिर केली आहे.

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी उमेदवारांच्या तीन याद्या जाहिर केल्या असून आज करण्यात आलेली चवथी यादी आहे. या तिसऱ्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडीने यावेळी तिसऱ्या यादीतून जाहिर केली.

विधानसभा निव़डणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांकडून अद्याप जागा वाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या होत असून अनेक मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीने या मोठ्या पक्षांच्या सोबत आघाडीच्या फेऱ्यात न अडकता २८८ मतदारसंघात आपले उमेदवार देण्याचे निश्चित करत इतर सर्व राजकिय पक्षांच्या तुलनेत सर्वात आधी निवडणूकीचा अजेंडा आणि उमेदवारांची यादी जाहिर करण्यास सुरुवात केली. तसेच युती-आघाडी करण्याचा विचार केला नाही.

दरम्यान, काही आदीवासी समाजाच्या राजकिय पक्ष आणि संघटनासोबत वंचित बहुजन आघाडीने युती केली असून या आदीवासी संघटना आणि राजकिय पक्षांसाठी आदीवासी बहुल जिल्ह्यातील मतदारसंघ त्यांच्या मागणीप्रमाणे सोडण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यानिमित्ताने मराठा समाजासोबत राजकिय आघाडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच ओबीसी समाजाच्या संघटनांशी जवळीक वाढवित त्यांनाही आपलंस करण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठा आणि ओबीसी समाजाने सोबत जाण्यास नकार दिला.

मात्र मुस्लिम समाजाचे प्रश्न अॅ़ड प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित करत मुस्लिम धर्मिय इच्छुक उमेदवारांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. मात्र इतके करूनही वंचितच्या हाती विधानसभा निवडणूकीत काय मिळणार याचे उत्तर निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतरच समोर येणार आहे.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *