संन्यासी माळा घातल्याने ओशो अनुयायी आणि आश्रम व्यवस्थापनामध्ये राडा पुण्यातील आश्रमासमोर झाला राडा अखेर पोलिसांना करावे लागले पाचारण

अध्यात्मिक भारतीय तत्वज्ञान आणि मानवी जीवनाचे सार मांडणारे आणि आपल्या अनोख्या विश्लेषणाच्या आधारे जगात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ ओशो यांच्या पुण्यातील कोरेगांव पार्क येथील आश्रमात संन्यासी माळा गळ्यात परिधान करणे आणि न करण्याच्या कारणावरून आश्रम व्यवस्थापन आणि अनुयायांमध्ये राडा झाला. त्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. मात्र अनुयायी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला.

जगभरात २१ मार्च हा दिवस ओशोंचे अनुयायी ‘संबोधी दिन’ म्हणून साजरा करतात. काल मंगळवार, २१ मार्च जगभरातले ओशोंचे अनुयायी ओशोंच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आश्रमात आले होते. यापैकी बऱ्याच अनुयायांच्या गळ्यात संन्यासी माळा होत्या.

संन्यासी माळा घालून आलेल्या अनुयायांना आश्रम व्यवस्थापनाने सांगितले की, तुम्हाला प्रवेश देता येणार नाही. त्यानंतर हे अनुयायी आक्रमक झाले. दरम्यान, या अनुयायांनी गेट तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, १५० ते २०० अनुयायी आत घुसले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी अनुयायांना समजावण्याचा प्रयत्न केला पण अनुयायी काही ऐकले नाहीत.

वास्तविक पाहता २१ मार्च हा दिवस ओशोंच्या अनुयांयाकडून संबोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे निमित्त साधत भारतासह जगभरातील अनेक अनुयायी पुण्यातील ओशो आश्रमाकडे येत होते. त्यावेळी अनेक अनुयायांनी गळ्यात संन्यासी माळा घालून प्रवेश करत असल्याचे आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यावेळी आश्रमाच्या व्यवस्थापनाने आश्रमात यायचे असेल तर संन्यासी माळा काढा आणि या अशी सूचना केली.

तसेच माळा काढल्याशिवाय आश्रमात प्रवेश देण्यास मनाई केली. या कारणावरून आश्रम व्यवस्थानाच्या विरोधात ओशो अनुनयांकडून आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी आक्रमक झालेल्या ओशो अनुयायांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केल्यानंतर अनुयायांची गर्दी पांगल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनानिमित्त खास लेख

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *