राज्य सरकारचा मोठा निर्णय: १० वीची परिक्षा अखेर रद्द मंत्रिमंडळ बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर सीबीईएस, आयसीईएस केंब्रीज बोर्डांनाही याबाबत सूचना करत पुढील निर्णय घेण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार या बोर्डांनी १० वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्तीवर राज्यातील १० वी बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली.

यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

१० वीची परिक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी विद्यार्थ्यांना इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून किती मार्ग द्यायचे, तसेच एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क हवे असतील त्याच्यासाठी परिक्षा घ्यायची का? या सर्व बाबींबाबत भविष्यकाळात निर्णय घेवून त्याची माहिती देण्यात येणार आहे. मात्र १२ वीच्या परिक्षा या घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर १० वीचा निकालाची तारीखही लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

१० वी ची परिक्षा ऑनलाईन घ्यायची किंवा ऑफलाईन घ्यायची याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आणि तरूणांमध्येही याचा फैलाव होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

अभिजीत दीपके यांची माहिती, पोलिसांनी परवानगी नाकारली, शांततेत जेलभरो आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

कॉकरोच जनता पार्टीच प्रमुख संयोजक तथा संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *