रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची माहिती, भारतासमोर निर्बंधांचे धोके… पण त्या निर्बंधांचे बुमरॅगही होतील

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “निर्बंधांच्या धमक्यां”द्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न “तात्काळ उलटेल”.

गुरुवारी (४ जून, २०२६) रात्री एका वृत्तसंस्थेशी बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी (५ जून, २०२६) सेंट पीटर्सबर्ग येथील वार्षिक आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावर ही टिप्पणी केली.

“भारत नेहमीच एक सार्वभौम देश म्हणून वागतो आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, निर्बंधांच्या कोणत्याही संभाव्य धमक्या तात्काळ उलटतील,” असे पुतिन म्हणाले.

भारतीय नेत्याला अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आल्याच्या काळाची आठवण करून देत, व्लादिमीर पुतिन म्हणाले की, ते पंतप्रधान मोदींसोबत दीर्घकाळापासून जवळच्या चर्चेत आहेत.

“मला माहित आहे की पंतप्रधान मोदी हे कधीही विसरणार नाहीत,” असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सांगत पुढे म्हणाले की, “आता ते पंतप्रधान झाल्यामुळे, सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत आणि माझ्या माहितीनुसार अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध यशस्वीरित्या विकसित होत आहेत.”

जर भारताने एसयू-५७ (Su-57) विमान किंवा एस-५०० (S-500) हवाई संरक्षण प्रणाली यांसारख्या रशियन संरक्षण प्रणाली खरेदी केल्यास भारताला अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता, व्लादिमीर पुतिन म्हणाले, “भारत एक सार्वभौम देश आहे आणि त्यांना जी उत्पादने सर्वात अद्ययावत, त्यांच्यासाठी सर्वात उपयुक्त आणि अर्थातच सर्वोत्तम किंमत देणारी वाटतात, ती निवडण्यास ते स्वतंत्र आहेत. लोक काहीही म्हणोत, भारताने नेहमीच याच पद्धतीने काम केले असल्याचे सांगितले.”

व्लादिमीर पुतिन पुढे म्हणाले की, “भारत नेहमीच आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतो,” असेही ते पुढे म्हणाले.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाचे भारतासोबतचे सहकार्य, इतर सर्व भागीदारांप्रमाणेच, राजकीय वातावरणाच्या अधीन नाही. “आम्ही कोणाच्याही हुकुमाचे पालन करू शकत नाही… कोणीही आम्हाला हुकूम देऊ शकत नाही, आणि कोणी तसा प्रयत्नही करणार नाही. जे आम्हाला योग्य वाटते तेच आम्ही नेहमी करणार आहोत, आणि आम्ही आमच्या भागीदारांना, विशेषतः भारतासारख्या भागीदारांना दिलेल्या वचनबद्धतेशी नेहमी प्रामाणिक राहू,” असे ते म्हणाले.

भारतासोबतच्या, विशेषतः संरक्षण क्षेत्रातील रशियाच्या दीर्घकालीन संबंधांवर प्रकाश टाकत व्लादिमीर पुतिन म्हणाले, “आमच्या परस्पर विश्वासामुळे भारतीय मित्रांसोबतचे आमचे संबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आम्ही केवळ व्यापारावर लक्ष केंद्रित करत नाही. केवळ खरेदी-विक्रीवरच नाही, तर आम्ही संयुक्त संशोधन आणि विकासावरही लक्ष केंद्रित करत आहोत.” दोन्ही देशांतील तज्ञ मध्यम पल्ल्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या रचनेवर कसे काम करत आहेत, यावरबद्दलही पुतिन यांनी सांगितले.

पाचव्या पिढीतील स्टेल्थ विमान सुखोई एसयू-५७ (Sukhoi Su-57) बाबत व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाने यापूर्वी भारतासोबत संयुक्त विकास कार्यक्रमाचा प्रस्ताव दिला होता, परंतु ती योजना प्रत्यक्षात न आल्याने नंतर स्वतंत्रपणे या प्रकल्पाचा पाठपुरावा केला.

“एसयू-५७ हे एक खूप चांगले विमान आहे, कदाचित सध्या जगातील सर्वात आधुनिक आणि अद्ययावत विमान आहे,” असे व्लादिमीर पुतिन म्हणाले. “आम्ही एकत्र मिळून हे करावे असा प्रस्ताव दिला होता. अर्थात, ते जमले नाही, पण आम्ही ते स्वतःहून केले आणि आम्ही एसयू-५७ विकण्यास तयार आहोत.”

दशकांपासून रशिया भारताचा प्रमुख संरक्षण पुरवठादार राहिला आहे. तथापि, युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा साखळीत सतत होणारे व्यत्यय आणि वितरणातील विलंबामुळे नवी दिल्लीला आपल्या लष्करी खरेदी धोरणात आक्रमकपणे विविधता आणण्यास भाग पडले आहे.

पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानासाठी अनेक वर्षांच्या शोधानंतर, भारताने आपला महत्त्वाकांक्षी ‘ॲडव्हान्स्ड मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (AMCA) प्रकल्प सुरू केला आहे, ज्याला देशाचा सर्वात मोठा स्वदेशी एरोस्पेस कार्यक्रम मानले जाते.

एएमसीए AMCA प्रकल्पांतर्गत येणारी विमाने २०३५ पूर्वी भारतीय हवाई दलात (IAF) सामील होण्याची शक्यता कमी असल्याने, तांत्रिक वैशिष्ट्ये पूर्ण करणाऱ्या एसयू-५७ विमानांच्या किमान दोन स्क्वाड्रन (सुमारे ३६) खरेदी करण्याचा सरकार विचार करत आहे.

About Editor

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु इंडिया ब्लॉकच्या बैठकीत म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी एकजूटी राहणे आवश्यक असल्याचे आवाहन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *