Tag Archives: भाजपा

अजित पवार यांचे कार्यकर्त्यांसमोर स्पष्टोक्ती, मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे

बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, महायुतीने १०० दिवसात आका, खोके शब्द दिले काँग्रेसची उद्या रविवारी ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा व सोमवारी ५ मे रोजी संविधान बचाव यात्रा

महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५८ हजार कोटींच्या विकास कामांचे अमरावतीत उद्घाटन आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीत विविध विकास कामांचा शुमारंभ

अमरावती राजधानीच्या पायाभरणी प्रसंगी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शहर आंध्र प्रदेशच्या आकांक्षांचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आणि ते “स्वप्न वास्तवात बदलणे” असे म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील ५८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमरावती हे …

Read More »

जात निहाय जणगणना, केंद्र सरकारसमोर अडचणींचा डोंगर नाही नाही म्हणत राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार केंद्र सरकारचा निर्णय

लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान उपस्थित

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जण – बहुतेक नागरिक – मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. नवी दिल्ली येथील …

Read More »

पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, खाजगी व्यक्ती विरोधात स्पायवेअर वापरल्यास चौकशी २०२१ च्या खटल्याच्या सुनावणीप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी करताना असे निरीक्षण नोंदवले की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्पायवेअर असलेल्या देशाकडे काहीही गैर नाही आणि खरी चिंता ही आहे की ते कसे आणि कोणाविरुद्ध वापरले जाते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की खाजगी व्यक्तींविरुद्ध स्पायवेअर वापरल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल. इस्रायली स्पायवेअर पेगासस वापरून …

Read More »

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ असतो का? असा सवाल विधानसभेतील  काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी आज केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधाने करणे म्हणजे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही यावेळी म्हणाले. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांचे म्हणणे आपण …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींवर टीकास्त्र, सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा बिहारमध्ये भाषण… पंतप्रधान मोदी यांच्या मोठमोठ्या गप्पा मारता येतात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “देशाचा स्वाभिमान दुखावला जात असताना पंतप्रधान मोदी बिहारमधील निवडणूक रॅलीत भाषण देत होते हे देशाचे दुर्दैव आहे,” असे ते …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, औद्योगिक विकास; सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान दिली ग्वाही

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंगरोड तयार करुन, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्लस्टरसाठी ५ एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औद्योगिक प्रदर्शन व …

Read More »