Tag Archives: bjp

अजित पवार म्हणाले, नाकाखालून नेलं, मग ते वेशभूषा बदलून जायचे ते काय होते? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांची टोलेबाजी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषदही झाली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अजित पवारांनी यावेळी सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे आदी मुद्यांवरून …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,…भाजपाचा तो डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत अतिप्रचंड महामोर्चा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाच्या प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात दिला मोदी सरकारला इशारा ‌‌तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केले. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना केंद्र …

Read More »

महामोर्चात उध्दव ठाकरेंचा इशारा, ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर… बाळासाहेबांची शिकवण घेऊन जाऊ म्हणणारे तोतया

महाविकास आघाडीचा महामोर्चा सीएसटी येथे पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल, भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, …

Read More »

भाजपा म्हणते, राजकिय अस्तित्वाच्या संकटामुळे मविआचा महामोर्चा भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे केली. पाकिस्तानचे …

Read More »

संजय राऊत यांचे टीकास्त्र, त्यांची ताकद फक्त वागळे इस्टेट आणि पाचपाखडी पुरतीच.. त्यांच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू नुसता वळवळत असतो

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहे. या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून आज १७ डिसेंबर रोजी ठाणे बंदची हाक दिली. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडक पध्दतीने दिलगिरी व्यक्त केली जातेय सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या पक्षाला झालं तरी काय

महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …

Read More »

आता चित्रा वाघ यांची मागणी, राज्यात लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे सुषमा अंधारे, संजय राऊत यांनी माफी मागावी

मागील काही महिन्यांपासून आंतरधर्मिय विवाह केलेल्या जोडप्यांमधील एकाची हत्या झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या. त्यानंतर भाजपा आमदार नीतेश राणे, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्या घटनांना लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्रातही या पध्दतीचा कायदा करण्याची मागणी केली. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

बच्चू कडू म्हणाले, …रट्टा दिला पाहिजे, बदली म्हणजे ते घरीच जातील राज्यपालांसह भाजपा नेत्यावर साधला निशाणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनीही या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान या मोर्चावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बच्चू …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांच्या डोक्यात नेमके कोणते किडे वळवळतायत आघाडीच्या मोर्चात महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावे

महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढला जात आहे. भाजपाची काही नेतेमंडळी आणि खुद्द राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य, बसवराज बोम्मईंची आक्रमक भूमिका आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग यावरून सरकारविरोधी भावना व्यक्त होत आहे. त्यातच राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न आणि महागाईच्या मुद्यावरही या …

Read More »