मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र गंभीर दुष्काळाने होरपळून निघाला असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास विलंब करीत असून, दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करणे हे शेतकऱ्यांचे शोषण आहे. फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’ असे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील …
Read More »शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार १२ हजार रूपयांचा अग्रिम कोणत्याही सणाला मिळणार
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सण अग्रिमात वाढ केली असून आता हा अग्रिम १२ हजार ५०० रुपये एवढा राहील. १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८०० पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना …
Read More »छत्रपतींच्या स्मारकाला तांत्रिक परवानगी नाही सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा नवाब मलिक यांचा आऱोप
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे दोन वर्षापूर्वी मोदींनी जलपूजन केले होते. परंतु पुढे त्याचे काही झालेले नाही. …
Read More »२२ हजार कोटींच्या गुंतवणूकीसाठी १० हजार कोटींची सबसिडी धारावी प्रकल्पातील गुंतवणूकीसाठी राज्य सरकारची अभिनव शक्कल
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी झोपडपट्टी पुर्नवसनाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्यातील फडणवीस सरकारने पुढाकार घेतला. या पुर्नवसनासाठी २२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची तयारी काही गुंतवणूकदारांनी दाखविली असली तरी, या गुंतवणूकीच्या बदल्यात राज्य सरकारकडून तब्बल १० हजार कोटी रूपयांची सबसिडी गुंतवणूकदाराला देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी …
Read More »मुंबईतील सीसीटीव्ही डायल १०० शी जोडणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासह डायल १०० प्रकल्पाचे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच या प्रकल्पासाठी येणाऱ्या ९८० कोटी ३३ लाख ८० हजार रूपये खर्चासही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई शहराच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी मिळणार आहे. मुंबई …
Read More »जलयुक्त शिवार राज्यातला सर्वात मोठा घोटाळा प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झाली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे असे सांगून जनतेची फसवणूक करत आहे. राज्यात दुष्काळसदृश्य नाही …
Read More »छत्रपतींचा आशीर्वाद मागणारेच शेतकऱ्यांवर अन्याय करतायत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भाजपवर टीका
बीडः प्रतिनिधी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न घेवून दिल्लीत गेले परंतु तिकडे मंत्री भेटलेच नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. दुसऱ्याबाजूला महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकने तेथील परिस्थिती पाहून तातडीने दुष्काळ जाहीर केला. राज्यात आणि केंद्रात सत्ता तुमची असताना मग प्रश्न कुठे आहे असा सवाल करत राज्यात एकाबाजूला छत्रपतींचा आशीर्वाद …
Read More »सर्वांसाठी घरांच्या निर्माणाची जबाबदारी आता म्हाडा ऐवजी स्वतंत्र मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान गृहनिर्माण योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य पिछाडीवर राहील्याने केंद्र सरकारकडून कानपिचक्या मिळाल्या. त्यामुळे शहाणे झालेल्या फडणवीस सरकारने राज्यात पंतप्रधान गृहनिर्माण योजना प्रभावी राबविण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे अर्थात …
Read More »निवृत्तीवेतन हवय तर ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करा वित्त विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय सेवेतून निवृत्त तसेच राज्य शासकीय निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ते ज्या बॅंकेतून निवृत्तीवेतन घेत असतील तिथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वांद्रे येथील वित्त विभागाच्या उपअधिदान व लेखा अधिकारी रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे. अधिदान व …
Read More »दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त ? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबईः प्रतिनिधी सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला. महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३१ ऑक्टोबरनंतर राज्यात दुष्काळ …
Read More »
Marathi e-Batmya