मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या जनगणनेतील चुका केंद्राच्या अधिपत्याखालील रजिस्ट्रारने दुरूस्त केल्याची माहिती ग्रामविकास मंत्रालयाने सादर केलेल्या आपल्या १७ व्या लोकसभेच्या अहवालात नमूद केल्याची माहिती काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडकीस आणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यातील फोलपणा कउघडकीस आणत त्यांचे खोटेपणाचा भंडाफोड केला. ओबीसी समाजाचे …
Read More »पवार म्हणाले, आम्ही तिघे मिळून एकत्रित सरकार चालवतो, पक्ष नाही सहकार खाते, विधानसभा अध्यक्ष, स्वबळाच्या नाऱ्यावर पवारांनी भूमिका केली स्पष्ट
बारामती: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या सहकार खात्यावरून राज्यातील साखर कारखानदारीबद्दल अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत होते. तालिका अध्यक्ष तथा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष पदावरून केलेली विधाने यासह काँग्रेस पाठोपाठ आता शिवेसेनेनेही दिलेला स्वबळाचा नारा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास …
Read More »आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही! तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही ती आमची संस्कृती नाही. चंद्रकांत …
Read More »मत्स्य व्यवसायात उपाय सुचविणाऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रमाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आणि मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा नाना पटोलेंच्यावर पलटवार तर मुख्यमंत्र्यांना इशारा राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पु आहेत तसे महाराष्ट्रातील हे एक पप्पु
पुणे: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाढत्या महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीकेची झोड उठवित अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित दोन कारखान्यांचा उल्लेख होण्याबद्दल आरोप केला. राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पू आहेत तसेच नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत. ते …
Read More »शालेय शिक्षण मंत्री गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या वाहनाला अपघात
हिंगोली: प्रतिनिधी दोन दिवसांपासून हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघात कोणालाही ईजा झाली नाही. मंत्री गायकवाड या एक कार्यक्रम आटोपून दुसऱ्या एका ठिकाणाची पाहणी करण्यासाठी चालल्या असताना एका मिनी टेम्पोने त्यांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे गाडीच्या मागील बाजूस किरकोळ नुकसान …
Read More »फडणवीस, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ फोन टॅपींगप्रकरणी चौकशी समितीची राज्य सरकारकडून स्थापना
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात राजकिय नेत्यांचे फोन टॅपींग करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शिवसेनेच्या आमदाराने पावसाळी अधिवेशनात केल्यानंतर यासंपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. त्यानुसार राज्याचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षखाली एका समितीची स्थापना आज करण्यात आली. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री …
Read More »राज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे मुळे अत्यावश्यक असेल तरच बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र आता त्यात थोडीशी शिथिलता आणत फक्त १५ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदली करण्यास राज्य सरकारने सर्व विभागांना परवानगी दिली असून ज्यांचा कालावधी विहित कालावधी पेक्षा जास्त झाला आहे अशांनाच प्राधान्य देण्याची सूचना …
Read More »डब्बे बदलण्यापेक्षा देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ ! रस्त्यावर चुली मांडून केला मोदी सरकारचा निषेध : नाना पटोले
पुणे : प्रतिनिधी मोदी सरकार मागील ७ वर्षात देश अधोगतीकडे घेऊन गेले आहे. ७० वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशाला विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले होते. परंतु मोदी सरकारने ७० वर्षातील हे वैभव अवघ्या ७ वर्षात विकण्याचा सपाटा लावला आहे. नोटबंदी, जीएसटीने मोठे नुकसान केले. महागाई, …
Read More »केंद्रात फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची …
Read More »
Marathi e-Batmya