Tag Archives: covid-19

पंतप्रधान मोदीजी, आता सर्वच अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात …

Read More »

कोरोना : २ दिवसात विक्रमी घरी गेले तर २४ तासात सर्वाधिक संख्येने वाढले ४८४१ रूग्णांचे निदान, १९२ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी काल ४१६१ आणि आज ३६६१ रूग्ण बरे होवून गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ७७ हजाराच्या घरात पोहोचली. मात्र दुसऱ्याबाजूला काल ३८०० रूग्ण तर आज थेट राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४ हजारापार जात ४८४१ इतकी नोंदवली गेली. ही संख्या आतापर्यतची सर्वाधिक संख्या आहे. तर १९२ जणांच्या मृत्यूची संख्या नोंदविली …

Read More »

राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही विक्रमी कोरोनाग्रस्त बरे होवून घरी आज ३६६१ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश …

Read More »

खुशखबर: कोरोनावरील औषधांचा मुबलक साठा लवकरच प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी कोरोना हा आजार बरा होत आहे. सध्या १० लाख लोकांमागे ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचे सांगत मृत्यूदारमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. हि वाढही कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील रेमडेसिवीर, फ्लीकवीर यासह उपलब्ध असलेली पाच औषधे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले हस्तक्षेप करा मेडिकलच्या परिक्षा डिसेंबरनंतर ठेवा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया परिक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करत जुलै महिन्यात परिक्षा घेण्यास सांगितले. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची परिक्षा आयोजित केली तर प्रत्यक्ष रूग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता जाणवेल. त्यामुळे या परिक्षा पुढे ढकल्यासाठी आपण हस्तक्षेप …

Read More »

कोरोना : पहिल्यांदाच बाधितांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त तरीही ३८९० नवे रूग्ण, २०८ जणांचा मृत्यू तर ४१६१ रूग्ण बरे होवून घरी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात ८ मार्च पासून दररोज कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र आज पहिल्यांदाच कोरोनाबाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची एकूण आकडेवारी वाढलेली दिसत आहेत. मागील २४ तासात ३८९० नव्या रूग्णांचे निदान झाले तर २०८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ४१६१ रूग्ण घरी गेल्याने बरे झालेल्या रूग्णांची एकूण …

Read More »

महिन्यात दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने बरे झालेल्या ४१६१ रुग्णांना सोडले मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत …

Read More »

परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड विरहीत प्रवासासाठी कृतीदल शुक्रवारी होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या विष्णूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतूकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधीसह परिवहन मंत्री अँड अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल ( Transport Task force) स्थापन करण्यात आले आहे. राज्यात कोविड-19 या विषाणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याच …

Read More »

कोरोना : २४८ मृतकांची नोंद, पण आकडेवारी २४ तासातील नाही ३२१४ नव्या रूग्णांचे निदान, ६९ हजार रूग्ण घरी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आरोग्य विभागाकडून सध्या मृतकांच्या संख्येवरून घोळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत असून २४ तासात झालेल्या मृतकांची आकडेवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्वाधिक २४८ रूग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले तरी ही आकडेवारी २४ तासातील नाही तर यातील ७५ मृत्यू ४८ तासातील …

Read More »

खुषखबर ! वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार …

Read More »