सोलापूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल ९० रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज ६७ रूग्णांचे निदान ७ जणांचा मृत्युची नोंद होत एकूण १६१ मृतकांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १८९१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११ जिल्ह्यात आज एका …
Read More »कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय, मृतकांच्या संख्येत पारदर्शकता नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली लक्ष देण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. ऑक्सीजन न मिळाल्यामुळे कोरोनारूग्णांचा मृत्यू ही त्याचेच द्योतक असून आजही या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत अजूनही पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी आज पत्र पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. १९ जून २०२० रोजी …
Read More »कोरोना: बरे होण्याचे प्रमाण वाढले तरी मृत आणि नव्या रूग्णांच्या संख्येत वाढच ३८२७ नवे रूग्ण तर १४२ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार वर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या संख्येत चांगल्यापैकी वाढ होत असली तरी दैंनदिन मृतकांच्या आणि रूग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड बनत चालले आहे. मागील २४ तासात १४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली तर नवे ३ हजार ८२७ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार ६५१ वर …
Read More »कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आता ‘टेलीआयसीयु’ तंत्रज्ञान मुंबईसह राज्यात सात जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापरणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची माहिती
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयु) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ‘टेलीआयसीयु’ सुविधेचा वापर केला जणार असून मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या ७ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर …
Read More »खुषखबर: अंतिम वर्षाच्या परिक्षा नाहीच मात्र ATKT चा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे अशक्य आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा द्यायची असेल त्यांची परिक्षा घ्यावी असे स्पष्ट आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा न देता अभ्यासक्रमाचे पदवी (डिग्री) …
Read More »कोरोना: कालच्यापेक्षा मृतकांची संख्या कमी मात्र रूग्ण संख्येत वाढ ३ हजार ७५२ नव्या रूग्णांचे निदान तर १०० मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु असून त्याचाच परिणाम आजच्या मृतकांच्या संख्येवर दिसून येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला नव्या रूग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत असून आज ३७५२ रूग्ण आढळून आले. तर १०० मृतकांची नोंद झाली आहे. तर १६७२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने …
Read More »कोरोनाचा धोका : मोफत तांदूळ व डाळ वाटण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ द्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची केंद्राकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रती शिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम …
Read More »मुबईसह राज्यात गणेशोत्सव साजरा होणार मात्र मिरवणूका नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत साधेपणाची चौकट …
Read More »कोरोना: बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठी प्रगती तर नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ ३३०७ नवे रूग्ण, ११४ जणांचा मृत्यू तर ५१ हजारावर अॅक्टीव्ह रूग्ण
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात राज्याच्या आरोग्य यंत्रणेला यश असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला बाधीत रूग्णांची संख्याही दिवसागणिक कमी-जास्त होत असल्याने नवे रूग्णही संख्येने आढळून येत आहेत. मागील २४ तासात ३३०७ नव्या रूग्णांचे निदान तर ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३१५ जण बरे होवून …
Read More »न्यायालयाने सांगितलेल्या संस्था वगळता इतर सहकारी संस्थाच्या निवडणुका नाही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. या आदेशामधून फक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या संस्थांना वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग …
Read More »
Marathi e-Batmya