Tag Archives: deputy chief minister

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी भाजपाकडून सातत्याने सैन्यांचा अपमान, मोदी व नड्डांनीच माफी मागावी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान …

Read More »

अजित पवार म्हणाले, बाजार समित्यांचे सक्षमीकरण शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे राष्ट्रीय बाजार अनुषंगाने राज्यातील बाजारांच्या विकासात शेतकऱ्यांचे हित व सदस्यांच्या अधिकारांचेही रक्षण व्हावे

राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अधिक समन्वयाने काम करणार राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठकीनंतर दिली माहिती

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीला …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द

भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस …

Read More »

अजित पवार म्हणाले, भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी

भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश …

Read More »

वैभवी देशमुख हिच्या परिक्षेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे बारावी परिक्षेत मिळविले यश

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज ‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धीत सहकार्य

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन

पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More »

अजित पवार यांचे कार्यकर्त्यांसमोर स्पष्टोक्ती, मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही उभ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी सज्ज होऊया -सुनिल तटकरे

बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. त्या सर्व घटकांनाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश …

Read More »

अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत होणारे शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रीयेत सुधारणा करुन घ्यावी. आदिवासी शेतकऱ्यांना आपले धान ट्रायबल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (टीडीसी) अथवा व्यापाऱ्यांना विकण्याचे दोन्ही पर्याय खुले करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच वाहतुकीसह योग्य साठवणुकीअभावी होणारे धानाचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने …

Read More »