पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया …
Read More »एकनाथ शिंदे यांचा विश्वास, ‘फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६
महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, ‘फार्म टू फॉरेन’ संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक एक्सपोर्ट हब होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड सेंटर येथे असोचेम …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप-२०३२ स्पर्धा आयोजनाला शासनाचे पाठबळ, जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ साठी ६ हजार ४७७ कोटी, गौण खनिजांचे स्वामीत्वधनाचे अनावश्यक खटले कमी होणार, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर, गडचिरोली जिल्हा क्रीडा …
Read More »धनंजय शिंदे यांची मागणी, एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पालक नगरविकास विभागात कार्यरत
भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता एमएमआरडीए MMRDA च्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. या परिक्षेचा १४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेला निकाल आणि गुणवत्ता यादीसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मेरिट लिस्टच्या प्राथमिक …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद
राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती, राज्यातील १० नगर पंचायती आणि परिषदांच्या विकास आराखड्यांना मंजुरी गेल्या दीड वर्षात १०० हून अधिक शहरांच्या विकास आराखड्यांना मान्यता
राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने विशेष पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात राज्य शासनाने सुमारे १०० पेक्षा अधिक …
Read More »अमित शाह यांची घोषणा, महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना २०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन
राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे असे निर्देश …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे आठ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ, मुंबईतील शासकीय कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली, राज्य माहिती आयोगात तीन अतिरिक्त आयुक्त, सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेणार लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी व्यापक जनजागृती करणार
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्रे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी शिंदे यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी …
Read More »
Marathi e-Batmya