विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद …
Read More »आधी हिंतेंद्र ठाकूरांचे विनोद तावडेंवर आरोप नंतर ठाकूरांनीच तावडेना बाहेर काढले विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषद रद्द
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपये वाटत असल्याचे प्रकरण बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनीच उघडकीस आणले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर विनोद तावडे भाजपामधील एका बड्या नेत्याच्या …
Read More »राजकिय पक्षांच्या प्रचार तोफा थंडावल्या, निवडणूक आयोगाने जारी केला महत्वाचा आदेश राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने सुरु असलेल्या सर्वपक्षिय प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मागील २० ते २५ दिवसापासून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने आपपाल्या प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या वतीने भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी पुन्हा एकदा धार्मिक आधारावर मते मागण्याचा अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचा …
Read More »मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मोफत वाहन व्यवस्था • समन्वय अधिकारी व रूट प्लानची माहिती मिळण्यासाठी क्युआर कोडची निर्मिती
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ (No voters to be left behind) या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा आरोप, सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर… पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु
२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी …
Read More »निवडणूक आयोगाकडून आता दूरचित्रवाणी अर्थात टीव्हीवरील बातम्यांवर लक्ष दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष
महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित …
Read More »निवडणूक काळात आयोगाकडून ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष …
Read More »अशोक गेहलोत यांचा सवाल, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ सारख्या घोषणांवर कारवाई का नाही? मविआचे सरकार चोरणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा
भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थान मध्येही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने चोरले, त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली असून …
Read More »नाना पटोले यांची मागणी, आयोगाने पोलिस महासंचालक वर्मा यांच्या नियुक्तीबाबत हस्तक्षेप करावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक (DGP) म्हणून सशर्त नियुक्ती करण्याची कृती ही घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि स्थापित प्रशासकीय तत्त्वे यांचे उघड उघड उल्लंघन करणारी आहे. यामुळे पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ व निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागले म्हणून निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर …
Read More »मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला उच्च न्यायालयात आव्हान निवडणूक आयोगाच्या नियमाच्या विरोधात मनसेकडून उच्च न्यायालयात याचिका
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेल्या अधिसुचनेला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. लवकरच याचिकेवर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल फोन आणण्याची आणि डिजीलॉकर ॲपद्वारे ओळखपत्रे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी …
Read More »
Marathi e-Batmya